शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात डेंग्यूसदृश तापाचे १० बळी

By admin | Updated: November 3, 2014 00:38 IST

जालना : गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत या तापाने १० बळी घेतले आहेत

जालना : गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत या तापाने १० बळी घेतले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूने एकाही रुग्णाचा बळी गेला नसल्याचा दावा केला आहे. याउलट ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ठावठिकाणा राहत नाही, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.दोन दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेतही डेंग्यूचा विषय गाजला. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून विविध गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने पाहिजे तशी दखल घेतली नाही. किंबहुना या साथरोगाला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने सांघिकरित्या काहीच केले नाही. पंचायत विभागामार्फत त्या-त्या गावांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत. ग्रामपंचायतींनी एकदा धूरफवारणी केली. परंतु पुढे ती झाली नाही.भोकरदन तालुक्यातील पद्मावती, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे अनुक्रमे दोन व तीन जणांचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाला. परतूर शहर,जळगाव सपकाळ येथे एका तरूणाचा मृत्यू झाला. नळणी, कोदोली, वालसावंगी, लेहा, बठाण इत्यादी ठिकाणीही डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले. अन्य काही ठिकाणीही तापाच्या आजाराने ५ रुग्णांचा मृत्यू झाला.अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये डासअळी आढळून आली. घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. रुग्णांमध्ये विशेषत: बालकांमध्ये शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी होण्याचे प्रकार आढळून आले. गावात डॉक्टर नसल्याने तापाने फणफणलेल्या काहींनी आजार अंगावरच काढला. त्याचा परिणाम म्हणून या रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांना शहरी भागात नेऊन तेथील रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले, असे काही ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)