अंभईत दहा कावळ्यांच्या मृत्यूने खळबळ दहा कावळ्यांचा मृत्यू तडफडून मृत्यू अज्ञात रोगाची शंका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:28+5:302021-02-06T04:07:28+5:30
अंभई : सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहा कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना ...

अंभईत दहा कावळ्यांच्या मृत्यूने खळबळ दहा कावळ्यांचा मृत्यू तडफडून मृत्यू अज्ञात रोगाची शंका?
अंभई : सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहा कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघड झाली असून एकच खळबळ उडाली आहे.
येथील वडेश्वर मंदीराच्या परिसरातील नाल्याच्या आजूबाजूला काही अंतराने कावळे मुत्यूमूखी पडले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सय्यद महेमुद यांना शुक्रवारी सकाळी कळाली. त्यांनी लगेचच ग्रा.पं. सदस्य जगन्नाथ जाधव, कर्मचारी नामदेव दांडगे यांना माहिती देऊन सिल्लोड वनविभागाचे पी.एन. राजपूत व पशुसंवर्धन विभागाला कळविले. माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक, पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशु संवर्धन अधिकारी (विस्तार) अभिषेक खडसे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष साळवे यांनी सहकांऱ्यांसह घटनास्थळी येऊन मृत कावळ्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवून दिले. सदर ठिकाणच्या तिनशे मीटरपर्यंत माणसांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून खबरदारी घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष साळवे यांनी केले आहे. परिसरात अजुन काही कावळे मृत झाले आहे, का याचा शोध वनविभाग घेत असल्याचे वनरक्षक पी. एन. राजपूत यांनी सांगितले.
कोट
अंभई येथील मृत झालेले कावळे ताब्यात घेऊन उतरीय तपासणीसाठी
भोपाळ प्रयोग शाळेत पाठविली आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे तपासणी अहवानांतर स्पष्ट होईल.
- अभिषेक खडसे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सिल्लोड.
फोटो : अंभई येथे मृत अवस्थेत आढळलेला कावळा.