टेम्पो टिप्परवर आदळला; ३० भाविक किरकोळ तर ४ गंभीर

By Admin | Updated: June 13, 2014 00:38 IST2014-06-13T00:20:08+5:302014-06-13T00:38:16+5:30

निगडगा : गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी करुन ब्रेक लावताच पाठीमागून येणाऱ्या टेम्पोचालकास गतिरोधकाचा अंदाज आला नाही.

Tempo tips cracked; 30 devotees in retail and 4 serious | टेम्पो टिप्परवर आदळला; ३० भाविक किरकोळ तर ४ गंभीर

टेम्पो टिप्परवर आदळला; ३० भाविक किरकोळ तर ४ गंभीर

निगडगा : गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी करुन ब्रेक लावताच पाठीमागून येणाऱ्या टेम्पोचालकास गतिरोधकाचा अंदाज आला नाही. यामुळे टिप्परवर टेम्पो आदळला. यात ३० भाविक किरकोळ तर ४ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात १२ जून रोजी पहाटे दोन वाजता नरसी-मुखेड राज्य मार्गावर होटाळा गावानजीक घडला.
गंगाखेड, पालम (जि. परभणी) येथील जवळपास ३० भाविक कंदुरीच्या कार्यक्रमासाठी बडापहाड (आंध्र प्रदेश) येथे टेम्पो (क्र. एमएच-२३-६४४२) ने जात होते. होटाळा गावानजीक पुढे जात असलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या टीप्परवर (क्र. एमएच-२४-जे-७२२०) जोरदारपणे आदळला. या अपघातात मुंजाजी तुकाराम भेंडेकर (वय ५०, रा. चिखलवाडी ता. गंगाखेड), सुशीलाबाई उत्तम आवळे (वय ४०, रा. काजलगाव ता. पालम), सुरेश दासू पुळगे (वय २५, रा. परभणी) हे गंभीर जखमी असल्याने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठविले. नंतर नांदेडला सर्व जखमींना पाठविले. अन्य जखमीची नावे अशी-विजयाबाई बापूराव गंजगे (वय ५४), माधव गंगाराम गंजगे (३४), यशवंत मष्णाजी जावेर (३८), दत्ता सटवा खेडेकर (३५), पार्वती आवळे (३०), मंगेश रामा गडगे (९), रविकांत बाळासाहेब भेंडे (१०), लक्ष्मी दत्ता खेडेकर (३०), संतोष दत्ता खेडेकर (९), सावित्रा मारोती बरदेवार (४०), इवलशा शेषराव आवळे (४५), सुमनबाई नागोराव गवाले (६०), सोजरबाई ज्ञानू आवळे (४०), बाळासाहेब शंकर भेंडे (४२), शेषराव आश्रूबा भाऊले (४०), शिवाजी संभाजी भेंडेकर (४२), चंद्रकांत उद्धव तूरनर (२६). जखमीवर नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे बळी देण्यासाठी सोबत घेतलेला बकरा मात्र वाचला. घटनास्थळी भेट देवून नायगाव पोलिस ठाण्याचे पोहेकॉ उमेश कारामुंगे यांनी पंचनामा केला. या प्रकणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Tempo tips cracked; 30 devotees in retail and 4 serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.