शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ओव्हरटेकच्या प्रयत्नात टेम्पो-कारची समोरासमोर धडक; एक ठार, १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:40 IST

भरधाव वेगाने असणाऱ्या दोन्ही वाहनांची ओव्हरटेक करताना समोरासमोर टक्कर झाली. 

सिल्लोड (औरंगाबाद) : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो आणि कारची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन एकजण ठार झाला. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) असे मृताचे नाव आहे. हा अपघात जळगाव-औरंगाबाद रोडवरील डोंगरगाव फाट्याजवळ बुधवारी संध्याकाळी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड येथून काहीजण कारमधून ( क्रमांक एम एच २० ईई ५०८४ ) कामानिमित्त  उंडणगावला जात होते. तर टेम्पो ( क्रमांक एम एच ०४ ई बी ००३४ ) सिल्लोडकडे येत होता. भरधाव वेगाने असणाऱ्या दोन्ही वाहनांची ओव्हरटेक करताना समोरासमोर टक्कर झाली. अपघातात सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) यांचा मृत्यू झाला.

जखमी प्रवास्यांची नावे अशी: जयाबाई किसन वानखेडे, सुनीता शामराव आळने, लक्ष्मीबाई म्हातारजी मोरे, यश विठलं वानखेडे, विठलं भिका वानखेडे, योगेश भीमराव बनसोडे, ठगणाबाई महादू केसापुरे, छाया विठलं वानखेडे, रेखा योगेश बनसोडे, गयाबाई गणेश मोरे, गणेश सखाराम मोरे, हिराबाई बाबुराव केसापुरे, रंगुबाई लक्ष्मण मोरे, निर्मला बाई कैलास वानखेडे, कैलास शामराव मोरे सर्व रा.कन्नड हे प्रवाशी जखमी झाले. यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय प्रथम उपचार करण्यात आले. यापैकी हिराबाई केसापुरे रा. सिल्लोड, विठलं वानखेडे , कैलास रामराव मोरे, योगेश भीमराव बनसोडे (  रा.कन्नड ) चार गंभीर जखमींवर औरंगाबाद येथे उपचार करण्यात येत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू