शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:13 IST

वाळूमाफियांना पोलिसांचे अभय? महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे.

छत्रपती संभाजीनगर : वाळूमाफिया दिवसेंदिवस कायद्याच्या सीमारेषा ओलांडत आहेत. वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा पकडून तहसील कार्यालयात घेऊन जाताना तहसीलदारांना अडवून शिवीगाळ करीत पथकाने ताब्यात घेतलेला हायवा पळविल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता पोलिस मेस, हडको परिसरात घडली. या प्रकरणी माफियांच्या विरोधात जिन्सी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेले ग्रामीण तहसीलदार रमेश मुंदलोड यांचेच शासकीय वाहन पोलिसांनी जप्त केले, पळवून नेलेला हायवा मात्र शोधला नाही. यामुळे पोलिस आणि महसूल प्रशासनातील बेबनाव समोर आला आहे. महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे.

विजय चौक परिसरात हायवा मुंदलोड व पथकाने ताब्यात घेतला. मात्र, दादा पवार या व्यक्तीने तहसीलदारांचे वाहन राेखले. तेथे मोठा जमाव आला. जमावात आणि महसूल पथकात बाचाबाची झाली; तर दुसरीकडे पोलिसांनीदेखील तहसीलदारांची तक्रार दाखल करून घेतली नाही. उलट तहसीलदारांचे वाहन जप्त केले. मुंदलोड यांनी शुक्रवारी दुपारी याचा अहवाल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना सादर केला. अहवाल सादर येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना हे काहीच माहीत नव्हते. दरम्यान, हायवाचे मालक पवार यांनी आरोप केला की, हायवा रिकामा होता. मुंदलोड यांची ग्रामीण हद्द असताना ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटीसाठी ते शहरात कारवाई करतात. ते व त्यांचे सहकारी ६ रोजी मद्यपान करून आलेले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते.

गुरुवारी रात्री काय घडले?तहसीलदार मुंदलोड गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास शासकीय वाहनाने घराकडे जात होते. विजय चौकात नंबरप्लेट नसलेला एक हायवा वाळूची चोरटी वाहतूक करताना दिसला. हायवाचालकाकडे रॉयल्टीच्या पावत्या नव्हत्या. तहसीलदार व पथकाने हायवा जप्त करून तहसील कार्यालयाच्या दिशेने जाताना हायवा पोलिस मेसजवळ येताच चालकाने दुसऱ्या दिशेने वळविला. तहसीलदारांनी पाठलाग करून हायवा थांबविला. त्यावेळी वाळूमाफियांनी तहसीलदार व पथकाला घेराव घालून शिवीगाळ केली. या गदारोळात हायवाचालक हायवा घेऊन पसार झाला. तहसीलदारांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठले. तिथेही वाळूमाफियांचे काही साथीदार जमले. तहसीलदारांनी हायवाचालकाविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता त्यांचेच शासकीय वाहन जप्त केले.

पोलिसांनी सहकार्य केले नाहीहायवा पळवून नेल्याप्रकरणात जिन्सी पोलिसांनी सहकार्य केले नाही. उलट झडतीसाठी माझेच शासकीय वाहन जप्त केले. या प्रकरणाचा अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.- रमेश मुंडलोड, तहसीलदार

दोषी पोलिसांवर कारवाईतहसीलदारांचे शासकीय वाहन जप्त करणे गंभीर आहे. या प्रकरणी पोलिस उपायुक्तांशी केली असून दोषी पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांना या प्रकाराबाबत लेखी पत्र दिले जाईल.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :sandवाळूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागPoliceपोलिस