तीसागवात मोबाईलचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:42 IST2019-07-09T22:42:04+5:302019-07-09T22:42:15+5:30
चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

तीसागवात मोबाईलचे दुकान फोडले
वाळूज महानगर : चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील साहित्याची तोडफोड करुन रोख रक्कम व मोबाईलचे साहित्य असा एकूण ३५ ते ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
नामदेव दत्तात्रय घावटे यांचे तीसगाव चौफुलीवर मोबाईलचे दुकान आहे. प्रकृती ठिक नसल्याने ते सोमवारी (दि.८) दुपारी १ वाजता दुकान बंद करुन घरी गेले.
दरम्यान, रात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप दगडाने तोडून शटर उचकटून रोख रक्कम व मोबाईचे साहित्य लंपास केले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.