१० कोटींच्या कामांना तांत्रिक मान्यतेच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:43 IST2017-10-28T00:43:03+5:302017-10-28T00:43:03+5:30
नगरपंचायतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामे करण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी रुपयांना मंजुरी दिली असून, त्या कामांना तांत्रिक मान्यता देऊन निधी वितरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या लेखी सूचना राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना दिले आहेत.

१० कोटींच्या कामांना तांत्रिक मान्यतेच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : नगरपंचायतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामे करण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी रुपयांना मंजुरी दिली असून, त्या कामांना तांत्रिक मान्यता देऊन निधी वितरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या लेखी सूचना राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना दिले आहेत.
नव्याने स्थापन झालेल्या औंढा नागनाथ नगरपंचायतीसाठी कधी नव्हे, एवढ्या मोठ्या प्रमाणात नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील यांनी विकास कामांसाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तशा सूचना नगरविकास मंत्रालयाला देण्यात आल्या.
त्यानुसार अवर सचिव विवेक कुंभार यांनी निधी वितरित करण्यासाठी १० कोटींच्या प्रस्तावित कामांना तांत्रिक मान्यता देऊन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
१० कोटींतील प्रस्तावित कामे
गणपती विसर्जन व श्री नागनाथांची पालखी मार्ग- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, नवीन गाव वेशीचे बांधकाम, जिरेगल्लीतील हनुमान मंदिरास संरक्षक भिंत, स्मशानभूमी विकास, शिवाजी चौक, टिळक चौक, दर्गा मशीद, इंदिरानगर, जावाईनगर, पंजेमन मोहल्ला, झोपडपट्टी, महाकाली मंदिर रोड, प्रभाग १ ते १७ प्रभागामध्ये सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, नाल्या, सुशोभीकरण, पाईपलाईन संरक्षक भिंती, विद्युत पुरवठा आशा विविध ५८ प्रस्ताविक विकास कामांची यादी नगरपंचायतीच्या वतीने तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी दिली आहे.
यामध्ये संपूर्ण शहराचा विकास कामांमध्ये समावेश करून घेण्यात आला असून, केवळ १० कोटींचे नव्हे तर शहराला नवीन पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ कोटींची योजना तयार करण्यात आली आहे.
त्या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तानाजी मुटकुळे यांनी हिरवा कंदिल दाखविला असल्याची माहिती नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील यांनी दिली आहे.