जनता मार्केटच्या मजबुतीची पथकाने केली पुन्हा तपासणी

By Admin | Updated: May 12, 2014 00:02 IST2014-05-11T23:41:17+5:302014-05-12T00:02:35+5:30

नांदेड: शिवाजीनगर येथील जनता मार्केटच्या इमारतीची पुनर्तपासणी रविवारी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाने केली़

The team re-examined the market for strengthening the market | जनता मार्केटच्या मजबुतीची पथकाने केली पुन्हा तपासणी

जनता मार्केटच्या मजबुतीची पथकाने केली पुन्हा तपासणी

 नांदेड: शिवाजीनगर येथील जनता मार्केटच्या इमारतीची पुनर्तपासणी रविवारी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाने केली़ या पथकाच्या अहवालानंतरच इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जी़ श्रीकांत यांनी दिली़ महापालिकेच्या मालकीच्या जनता बाजार व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक ठरवून येथील व्यापार्‍यांना गाळे रिकामे करण्यासाठी मागील वर्षी कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानंतर व्यापारी संकुलातील व्यापार्‍यांनी आयुक्त जी़ श्रीकांत यांची भेट घेवून इमारतीच्या पुनर्तपासणीची मागणी केली होती़ तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिका दुकान भाडेकरू व्यापारी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांना निवेदन देवून इमारत पाडण्याऐवजी ती दुरूस्त करण्याची मागणी केली होती़ दरम्यान, जनमा मार्केटच्या इमारतीची तपासणी करण्यास नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने असमर्थता दर्शविल्यानंतर हे काम दुसर्‍या शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला़ औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने रविवारी सकाळी जनता मार्केटच्या इमारतीचे अवलोकन केल्याचे आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सांगितले़ यासंदर्भात आयुक्त जी़ श्रीकांत म्हणाले, गतवर्षी नांदेडच्या गोकुळनगर येथील व्यापारी संकुलाची भिंत कोसळल्यानंतर शहरातील मनपाच्या धोकादायक इमारतींची तपासणी करण्यात आली़ यात जनता मार्केटची इमारत सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत कमी असल्याचा अहवाल प्राप्त झाला़ त्यामुळे गाळे रिकामे करण्याचे आदेश दिले होते़ जनता मार्केट इमारतीचे निरीक्षण औरंगाबाद येथील पथकाने केले़ त्यांच्या अहवालानंतरच निर्णय घेण्यात येईल़ दरम्यान, शहरातील धोकादायक इमारती पावसाळापूर्व पाडण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी) लोकांच्या जीवांशी खेळणार नाही- आयुक्त पावसाळापूर्व शहरातील धोकादायक इमारतींच्या संदर्भात तपासणी झाल्यानंतर त्यांच्या अहवालानंतर अशा इमारती पाडण्यात येतील़ लोकांच्या जीवांशी आम्ही खेळणार नसल्याचा पुर्नउच्चार आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केला़

Web Title: The team re-examined the market for strengthening the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.