शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 6:25 PM

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिक्षकदिनी काळ्या फिती लाऊन निषेध

ठळक मुद्देनविन पेन्शन बंद करून जूनी पेन्शन चालू करावी

 पैठण : देशभरात सर्वत्र शिक्षक दिन उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे पैठण येथील जि प प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंदांनी नवीन शिक्षकांना लागू असलेली अंशदायी पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिक्षकदिनी काळ्या फिती लाऊन निषेध व्यक्त केला.

शिक्षकदिनीच शिक्षकांनी केलेल्या या आंदोलनामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नविन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. हि योजना बंद करून  जुनीच पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करित आज ५ सप्टेंबर रोजी पैठण जि प प्राथमिक  शाळा क्र २ च्या  शिक्षकांनी  काळ्या फिती लावून कामकाज केले. 

पैठण तालूक्यातील शिक्षक अशोक औटे, सचिन डमाळे, अमोल बनसोडे, संतोष बोंबले आदींचे आकस्मिक निधन झाले,  या शिक्षकांना नविन पेन्शन लागू असल्याने या शिक्षकाच्या  कुटुंबाला काहीच मिळाले नाही आज या शिक्षकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे. आमच्या पगारातूनच शासन १० टक्के पगार कपात करत असून याचा काही एक  हिशोब देण्यात येत नाही असे या शिक्षकांचे म्हणने आहे. समान काम समान वेतनावर शासनाने आम्हाला नविन पेन्शन बंद करून जूनी पेन्शन चालू करावी अशी मागणी या वेळी उपस्थित शिक्षकांनी केली. 

यावेळी शौकत पठाण,  कुमार ढाकणे, जालिंदर शिरसाठ, अंबादास बोराडे, समशेर पठाण, लक्ष्मण गलांडे, तोतरे, प्रल्हाद पाखरे, अंकुश म्हस्के, अमोल बडे, राजेश पाखरे, सुधिर शिंदे, राहुल तांदळे ,श्रीमती संगीता आंधळे, श्रीमती नाझिया खान ,श्रीमती रोही शेख, श्रीमती यास्मिन शेख, श्रीमती शेख आदी शिक्षक उपस्थिती होते .

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Dayशिक्षक दिनzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार