शिक्षक नेते शेवटी तालुक्याबाहेर

By Admin | Updated: December 12, 2014 00:54 IST2014-12-11T23:35:04+5:302014-12-12T00:54:48+5:30

औरंगाबाद : समायोजनातून सूट मिळावी म्हणून मिळेल त्या संघटनेचे पत्र मिळवून रात्रीतून शिक्षक पुढारी झालेल्या ‘त्या’ २२ शिक्षक नेत्यांपैकी १२ जणांना बुधवारी तालुक्याबाहेर जावे लागले

Teacher leaders finally out of taluka | शिक्षक नेते शेवटी तालुक्याबाहेर

शिक्षक नेते शेवटी तालुक्याबाहेर

औरंगाबाद : समायोजनातून सूट मिळावी म्हणून मिळेल त्या संघटनेचे पत्र मिळवून रात्रीतून शिक्षक पुढारी झालेल्या ‘त्या’ २२ शिक्षक नेत्यांपैकी १२ जणांना बुधवारी तालुक्याबाहेर जावे लागले. दोन शिक्षक रजेवर असल्याने ते अजूनही तालुक्यात अतिरिक्तच आहेत. २० जणांच्या समायोजनात शिक्षण विभाग दिवसभर व्यस्त होता. नेत्यांची तालुक्याबाहेर जाण्याची मन:स्थितीच नव्हती, शेवटी सीईओंनी दम भरताच नेत्यांनी आदेश स्वीकारले.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १० डिसेंबरपर्यंत समायोजन करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी ही प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षक नेते तालुक्याबाहेर जाण्यास तयार नव्हते, त्यामुळे प्रक्रिया दिवसभर रखडली होती. शेवटी प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी या शिक्षक नेत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या समोर उभे केले. आदेश घ्या व उद्या रुजू व्हा, अन्यथा निलंबित करण्याचे फर्मान सीईओंनी सोडताच, नेते लगबगीने निघून गेले.
समायोजनातून सूट मिळावी यासाठी शिक्षक संघटनांच्या २२ पदाधिकाऱ्यांनी पत्रे दिली होती. पदाधिकाऱ्यांच्या नावाखाली जिल्ह्यातील इतर तालुक्यांतून कुणालाही सूट देण्यात आलेली नसताना औरंगाबाद तालुक्यात या २२ जणांना सूट मिळाली. त्यामुळे तालुक्यात शिक्षकांची संख्या अतिरिक्त झाली.
तालुक्यात शिक्षक अतिरिक्त झालेले असताना अनेक शाळांतून शिक्षक नाहीत. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Teacher leaders finally out of taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.