शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

बिंदुनामावलीच्या ‘पुनश्च हरिओम’मुळे शिक्षक मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:46 IST

बिंदुनामावलीचा आर्थिक भारही सोसावा लागणार

ठळक मुद्देधडक मोहीम राबविण्याचा आदेश ४८ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांचा प्रश्न 

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राज्यात २० आणि ४० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना पुन्हा एकदा अनुदान मिळविण्यासाठी बिंदुनामावली तपासून घेण्याचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. या नव्या आदेशामुळे पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील ४८ हजार शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. या बिंदुनामावलीसाठी लागणारा आर्थिक खर्चाचा भार बिनपगारी शिक्षकांवरच पडणार आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत २२ जून रोजी विनाअनुदानित शिक्षकांना २० व ४० टक्के अनुदान देण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिंदुनामावली अद्ययावत नाही. त्यामुळे अनुदान देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.  यानुसार शिक्षणमंत्री गायकवाड यांनी पात्र घोषित व अनुदानास पात्र असलेल्या शाळांची बिंदुनामावली तपासण्यासाठी ‘धडक मोहीम’ राबवून दोन महिन्यांत अहवाल सादर करावेत, असा आदेश दिला. यानुसार संचालक, उपसंचालक आणि शिक्षणधिकाऱ्यांना बिंदुनामावली तपासण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे विनाअनुदानित शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्यात अनुदानास पात्र आणि घोषित झालेल्या शाळांमध्ये २ हजार ४५२ प्राथमिक व माध्यमिक, तसेच १ हजार ६५३ उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये तब्बल ४८ हजारांपेक्षा अधिक शिक्षक वेतन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आधी तत्कालीन युती सरकारने व नंतर सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नाही. शिक्षक संघटनांच्या आग्रहामुळे घेतलेल्या २२ जून रोजीच्या बैठकीनंतर शिक्षण विभागाने पुन्हा एकदा बिंदुनामावली तपासण्याचा आदेश दिला आहे.

वेळकाढू धोरण थांबवा विनाअनुदानित शिक्षकांसंदर्भात आतापर्यंत वेळकाढूपणाचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. हे निषेधार्ह असून, पात्र ठरलेल्या शाळांना तात्काळ वेतन देण्यास सुरुवात करावी. - प्रा. सुनील मगरे, सचिव, मुप्टा संघटना 

हास्यास्पद आदेश काढण्यात आलाअनुदान घोषित व पात्र शाळांना पुन्हा एकदा बिंदुनामावली तपासणीचा आदेश दिला. हे हास्यास्पद आहे. कोणत्याही कायम विनाअनुदानित, अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पदांना मान्यता घेताना बिंदुनामावली तपासण्यात येत असते. ही नवीन पद्धत नाही, जुनीच आहे. अनुदानास पात्र ठरविताना बिंदुनामावली तपासण्यात आलेली आहे. पुन्हा तपासण्याचे आदेश देणे म्हणजे, आपल्याच यंत्रणेवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे. -विक्रम काळे, आमदार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ 

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र