शिक्षिकेस शिक्षा
By Admin | Updated: May 21, 2014 00:16 IST2014-05-20T23:56:05+5:302014-05-21T00:16:57+5:30
वाशी : न्यायालयाच्या आवारात शिक्षिकेने गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप सिध्द झाल्यामुळे त्यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली

शिक्षिकेस शिक्षा
वाशी : न्यायालयाच्या आवारात शिक्षिकेने गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप सिध्द झाल्यामुळे त्यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. तसेच दोनशे रूपये दंडही करण्यात आला. ५ आॅक्टोबर २०१२ रोजी दुपारी वडजी येथील रहिवासी व जि. प. च्या शिक्षिका आशाबाई तात्या जाधवर यांनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा खटला मुंबई पोलिस कायद्यानुसार हवालदार नितीन पाटील यांनी दाखल केला होता. हा खटला न्या. नितीन पवार यांच्यासमोर चालला. यात सरकार पक्षाच्यावतीने तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. शासकीय वकील प्रताप कवडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सदरच्या शिक्षिकेस कोर्ट उठेपर्यंत व दोनशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली. (वार्ताहर) यापूर्वीही सदरील शिक्षिकेस वाशी येथील तत्कालीन न्या. महेश खराडे यांनी ४ जानेवारी २०१४ रोजी घरामध्ये घुसून मारहाण केल्याच्या कारणावरून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दोनशे रूपये दंड केला होता.