शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा कारमध्ये अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:25 IST

शिक्षकासह कारचालकाला अटक; पोक्सोअंतर्गत विविध दहा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर शिक्षकानेच बळजबरी केली. दोन महिन्यांपूर्वी मुलीला शहरात रस्त्यात गाठून चालत्या कारमध्ये पुन्हा अत्याचार केला. शिक्षकाचा त्रास असह्य झाल्याने मुलीने कुटुंबाला हा प्रकार सांगितल्याने जवाहरनगर पोलिस ठाण्यात महेश विजय मखमले (वय ३४, रा. बुलढाणा) याच्यासह त्याचा कारचालक सिद्धेश्वर जायभाये याच्यावर पोक्सोअंतर्गत विविध दहा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी सांगितले.

मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या सोळा वर्षीय पीडितेच्या वडिलांचे २०१३ मध्ये निधन झाले. तिची आई इतरांच्या शेतात काम करून तिचा सांभाळ करते. ‘नीट’च्या तयारीसाठी ती २०२४ पासून शहरात खासगी ट्युशनमध्ये आली. तेथे विजय मखमले शिक्षक असल्याने त्यांचा संपर्क आला. ऑक्टोबर २०२४ मध्ये मखमलेने तिच्या मोबाईलवर 'मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे' असे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. एप्रिल, २०२५ मध्ये ती महाविद्यालयात पेपर देत असताना मखमलेने तिला वर्गातून उठवून शाळेच्या दुसऱ्या खोलीत नेले. तुझा एमबीबीएसला क्रमांक लागला की तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत विनयभंग केला. तेवढ्यात त्याचा नातेवाईक महेंद्र मखमले आल्याने महेशने मुलीला पाठवून दिले.

१९ ऑगस्ट रोजी मुलगी सायंकाळी भानुदासनगरच्या दिशेने पायी जात असताना महेशने तिचा पाठलाग करत रस्त्यात गाठत बळजबरी कारमध्ये बसवले. तिला पाण्यातून गुंगीकारक औषध दिले. सायंकाळी ७:३० वाजता तिला शुद्ध आली असता ती बीड बायपास परिसरात होती. तेव्हा तिला तिच्या शरीरावर चट्टे आढळून आले. शिवाय प्रचंड वेदना होत होत्या. आपल्यावर अत्याचार झालाय, याची जाणीव झाल्यानंतर तिने महेशला विचारणा केली. तेव्हा त्याने तिला धमकावत गुजरातला चलण्याचा हट्ट केला. तिने आरडाओरड केल्यावर कारमधून उतरवून दिले.

आत्महत्येचा प्रयत्न, मैत्रिणीने दिला आधारघडलेल्या प्रकारामुळे मुलगी मानसिक तणावाखाली गेली. शिक्षकाच्याच अत्याचाराची तक्रार देण्याची तिची हिंमत झाली नाही. त्यामुळे तिने हॉस्टेलमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी मैत्रिणीने तिला अडवल्याने हे प्रकरण उघडकीस आले. कुटुंबाला ही बाब कळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, निरीक्षक सचिन कुंभार यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले. उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी महेशसह चालक जायभायेला अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher Arrested for Assaulting Sixteen-Year-Old Student in Car

Web Summary : A teacher in Chhatrapati Sambhajinagar was arrested for sexually assaulting a 16-year-old student. He lured her with false promises of marriage and drugged her in a car. The girl attempted suicide, but her friend intervened. Police arrested the teacher and driver under POCSO.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण