कर भरणाऱ्यांना दुचाकी

By Admin | Updated: December 23, 2014 00:16 IST2014-12-23T00:16:51+5:302014-12-23T00:16:51+5:30

वाळूज महानगर : नागरिकांकडे असलेल्या थकित मालमत्ता कराच्या वसुलीसाठी रांजणगाव ग्रामपंचायतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांतून ‘लकी ड्रॉ’ काढून ‘भाग्यवान’ नागरिकांना

Taxes a biker | कर भरणाऱ्यांना दुचाकी

कर भरणाऱ्यांना दुचाकी


वाळूज महानगर : नागरिकांकडे असलेल्या थकित मालमत्ता कराच्या वसुलीसाठी रांजणगाव ग्रामपंचायतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांतून ‘लकी ड्रॉ’ काढून ‘भाग्यवान’ नागरिकांना दुचाकी व कचरा भरण्यासाठी बादली देण्याचा निर्णय घेतला आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या रांजणगावातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकला आहे. यामुळे सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला आर्थिक चणचणींचा सामना करावा लागतो. औद्योगिक वसाहतीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब कामगारवर्ग वास्तव्यास असून, त्यांना नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होते. कराच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर वसुलीसाठी अभिनव
उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटोदा ग्रामपंचायतीतर्फे आगाऊ करांचा भरणा करणाऱ्या नागरिकांना दरवर्षी संसारोपयोगी साहित्य तसेच नियमित कर भरणाऱ्यांना मोफत दळण दळून दिले जाते. यापासून प्रेरणा घेऊन रांजणगाव ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी नवीन फंडा अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत जवळपास १३ हजार मालमत्ताधारक असून, पाच हजारांपुढील थकित कर भरणाऱ्या नागरिकांना कचरा साठवून ठेवण्यासाठी डस्ट बिन देण्यात येणार आहे.
सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनीही पुढाकार घेऊन थकित करांचा भरणा करण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, दत्तू हिवाळे, सुभाष गोरे, जयश्री कोळेकर, सुनीता थोरात, अब्दुल अजीम, सुभाष सोनवणे, सुभद्राबाई बटुळे, संजय मंजुळे, उत्तमराव कानडे, लताबाई फाळके, उषाबाई शेजूळ, गोरखनाथ हिवाळे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.४
संपूर्ण थकित कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी सोडत काढून भाग्यवान करदात्यांना प्रजासत्ताक दिनी दुचाकी भेट देण्यात येणार असल्याचे सरपंच कांताबाई जाधव, उपसरपंच भारत पा.गरड, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर यांनी सांगितले.

Web Title: Taxes a biker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.