शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
4
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
5
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
6
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
7
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
8
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
9
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
10
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
11
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
12
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
13
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
14
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
15
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
16
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
17
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
18
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
19
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
20
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
Daily Top 2Weekly Top 5

टार्गेट रुग्णालये, स्मशानभूमी

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांनी आपले सॉफ्ट टार्गेट रुग्णालये आणि स्मशानभूमीला बनविले आहे.

औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांनी आपले सॉफ्ट टार्गेट रुग्णालये आणि स्मशानभूमीला बनविले आहे.वाहने चोरणारे जेरबंद स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांच्या ध्यानीमनीही नसते की, आपले वाहन चोरीला जाईल. कारण सर्व जण मरण पावलेल्या व्यक्तीच्या दु:खात असतात. याच मानसिकतेचा फायदा उचलत स्मशानभूमीसमोरून वाहने चोरणारी टोळी जिन्सी पोलिसांनी आज गजाआड केली.पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी देशी दारूच्या अड्ड्यांसमोर उभ्या असलेल्या दुचाकीही लांबविल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल नऊ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. शेख मजीद शेख महंमद (रा. फातेमानगर, हर्सूल) आणि सय्यद कैसर सय्यद अहमद (रा. हर्सूल सावंगी), अशी आरोपींची नावे आहेत. रोशनगेट परिसरात दोन तरुण दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला. शेख मजीद, सय्यद कैसर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी टीव्ही सेंटर भागातून हे वाहन चोरले होते. पोलिसांनी दोघांना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघांनी सिटीचौक व सिडको भागातून चोरी केलेली आणखी आठ वाहने दिली. शेख मजीद वाहन चोरून आणायचा, तर सय्यद कैसर विक्री करायचा. मौजमजेसाठी दोघेही हे काम करीत असत. ही कारवाई पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक अमित बागूल, जमादार दिनेश बन, मीर आरेफ अली, सुभाष शेवाळे, इरफान खान, अश्रफ सय्यद, संदीप तायडे आणि संजय नंद यांनी केली.