जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न व्हावेत-टोपे यांचे प्रतिपादन
By Admin | Updated: July 3, 2014 00:20 IST2014-07-02T23:26:04+5:302014-07-03T00:20:50+5:30
जालना : पाण्याचे नियोजन आणि जतन होण्यासाठी स्त्रोत शोधून ते सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न व्हावेत-टोपे यांचे प्रतिपादन
जालना : पाणी हा नैसर्गिक स्त्रोत्र आहे. पाण्याचे नियोजन आणि जतन होण्यासाठी जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत शोधून ते सुरक्षित ठेवण्यात यावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा परिषदेत आयोजित जिल्हा पाणी गुणवत्ता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
पाणी गुणवत्ता सर्व्हेक्षण कार्यक्रमांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषद झालेल्या पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा भुतेकर, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्याकर केंद्रे, जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ.डी.डी.भगत, ग्रामीण पाणीपुरवठ विभागाचे तांगडे, पंडित भुतेकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दूषित पाणी पुरठ्यामुळे अनेक साथीचे रोग उद्भवतात त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होऊ नये यासाठी संबंधित विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
दूषित पाण्यासंदर्भात जिल्ह्यात निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, त्यावर आणखी काम करणे अत्यावश्यक आहे.
पाणी गुणवत्तेबरोबरच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न होणे गरजचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
(वार्ताहर)
प्रयोगशाळांची गरज
जिल्हा प्रयोगशाळेसह तालुका निहाय छोट्या गावांतही पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागात दूषित पाणी तपासणी करण्यासाठी प्रयोग शाळा नसल्याने दूषित पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मितीची मागणी होत आहे.