गंगाखेड शहरातील विद्युत खांबावरील तारा लोंबकळलेल्याच

By Admin | Updated: July 30, 2014 00:48 IST2014-07-29T23:53:58+5:302014-07-30T00:48:10+5:30

उद्धव चाटे, गंगाखेड शहरातील घरावर व रस्त्याच्या दुतर्फा विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

The tank on the electric pole in the city of Gangakhed is littered | गंगाखेड शहरातील विद्युत खांबावरील तारा लोंबकळलेल्याच

गंगाखेड शहरातील विद्युत खांबावरील तारा लोंबकळलेल्याच

उद्धव चाटे, गंगाखेड
शहरातील घरावर व रस्त्याच्या दुतर्फा विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
शहरामध्ये अनेक घरावरुन विद्युत तारा गेल्या आहेत. या तारा हाताला लागतील एवढ्या उंचावर आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विजेचा धक्का लागून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच दरवर्षी अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कुठल्याही प्रकारची नोंद होत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे फावते. शहरातील जवळपास दीडशे ते दोनशे घरावरुन लोंबकळत वीजतारा गेल्या आहेत.
या तारांना ताण द्यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे सर्रासपणे डोळझाक करीत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
१२३ विद्युत रोहित्र
शहरात जवळपास १२३ विद्युत रोहित्र आहेत. या विद्युत रोहित्राला दरवाजे अथवा जाळ्या अस्तित्वातच नाहीत. तसेच फ्युजला ताराच जोडण्यात आल्या आहेत. कंपनीकडून येणारे दरवर्षीचे कोट्यवधी रुपये खर्चाविना जातात, कुठे हा प्रश्नही पडला आहे.

Web Title: The tank on the electric pole in the city of Gangakhed is littered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.