लाखावरच बोळवण !

By Admin | Updated: July 16, 2014 01:23 IST2014-07-16T00:01:51+5:302014-07-16T01:23:55+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात सतत पडणारा दुष्काळ अन् यातून येणारे नैराश्य यामुळे जिल्हयातील बळीराजा पुरता कोलमडून पडलेला आहे.

Talking on the lac! | लाखावरच बोळवण !

लाखावरच बोळवण !

व्यंकटेश वैष्णव , बीड
जिल्ह्यात सतत पडणारा दुष्काळ अन् यातून येणारे नैराश्य यामुळे जिल्हयातील बळीराजा पुरता कोलमडून पडलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. १ जानेवारी २०१४ ते २८ जून २०१४ या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्हयातील ५५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतीची नापिकी व गारपीट यामुळे आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत शासनाने केली आहे. मात्र एक लाखाच्या मदतीने आत्महत्या थांबतील का असा प्रश्न जिल्हयातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहिया यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात असले तरी देखील या योजनांचा शेतकऱ्यांना उभा रहाण्यासाठी काहीच उपयोग होत नसल्याचेच शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारी वरून स्पष्ट होते. ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे पडताळणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांने खरोखरच नापिकी व कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली आहे का? हे पडताळून पाहण्यात आले. शेतकरी आत्महत्येची वेगवेगळी कारणे सांगण्यात आलेली आहेत. शासन समुपदेशन करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र समुपदेशनाच्या पलीकडे जाऊन शासनाने काम करणे आवश्यक असल्याचे मानवलोक संस्थेचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहीया यांनी सांगितले.
शेतीसाठी कर्ज मिळविण्यासाठी बँकाची उंबरटे झिजवून देखील बँका दारात उभ्या करत नाहीत. अलीशान वाहने घेण्यासाठी सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते मात्र शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करण्यासाठी कर्ज मागितले तर किमान २५ बँकाचे ना हारकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. पंचायत समिती मार्फत अल्प भू धारक शेतकऱ्यांना विविध औजारे दिली जातत. ही औजारे योग्य व गरजू शेतकऱ्यांपर्यंत जातात का? हे पहाणारी यंत्रणा आज तरी जिल्हा प्रशासनाकडे नाही. याचाच फायदा घेऊन ‘लँड लॉर्ड’ लॉबी शासनाच्या विविध योजना खाऊन टाकत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन करण्यात येते. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये असे उप जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
गेवराई तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जिल्ह्यात ५५ पैकी ३७ आत्महत्याग्रस्त शेतकरी शासन मदतीस पात्र ठरले आहेत. १४ शेतकरी अपात्र आहेत. तसेच गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याचा अहवालच जिल्हा प्रशासनाकडे आला नाही तर गेवराई येथीलच एक शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रस्ताव फेर चौकशीसाठी पाठविण्यात आलेला आहे. शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाहता एकट्या गेवराई तालुक्यात मागील सहा महिन्यात नापिकी, गारपिटीचे संकट यामुळे १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आष्टी तालुक्यात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.
फक्त ३७ कुटुंबियांना मिळाली मदत
जानेवारी २०१४ ते जून २०१४ दरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्या
तालुकापात्रअपात्रअहवाल प्राप्त नाही
बीड०७०४००
परळी०२०१००
गेवराई१२०४०२
पाटोदा०४०००१
अंबाजोगाई०३०१००
धारूर०५०१००
केज०१०१००
माजलगाव०००१००
शिरूर कासार०००१००
वडवणी०१००००
आष्टी०२००००

Web Title: Talking on the lac!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.