छत्रपती संभाजीनगर : महापालिका शाळेत ४१० शिक्षक असूनही विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्नच होत नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी माध्यमाच्या सात शाळा बंद होण्याची चर्चा आहे.
शहरात ११५ वॉर्डांमध्ये १० वर्षांपूर्वी पालिकेच्या ७२ शाळा होत्या. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत आहे. त्यामुळे प्रशासनाला शाळा बंद करून जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची वेळ येत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागील दोन वर्षांपासून शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला. प्रशासकांनी मनपा सीबीएसई पॅटर्नच्या शाळांची संख्या वाढवून त्यासाठी तासिका तत्त्वावर शिक्षकांची भरती केली. प्रशासकांनी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आता शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाला शाळेतील पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
या शाळा बंद होण्याची शक्यताशाळेचे ठिकाण--------एकूण विद्यार्थी संख्या- दैनंदिन पटसंख्याजिन्सी मनपा शाळा-५६------------------१७रोजाबाग मनपा शाळा-३५------------------२२भारतगर मनपा शाळा- ४२------------------२५शताब्दीनगर मनपा शाळा-८४------------------१२हनुमाननगर मनपा शाळा-५१------------------२२वाल्मी मनपा शाळा-५७------------------२५हर्सूल कारागृह मनपा शाळा-५३------------------२७