शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेला तलाठी अखेर निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:11 AM2018-12-13T00:11:49+5:302018-12-13T00:14:12+5:30

कृष्णापूरवाडी येथील प्रकरण : लोकमतच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कारवाई

 Talathi, who is responsible for farmer's suicide, is finally suspended! | शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेला तलाठी अखेर निलंबित!

शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेला तलाठी अखेर निलंबित!

googlenewsNext

फुलंब्री : जमीन परस्पर दुस-याच्या नावावर केल्यामुळे धक्का बसून शेतक-याने २५ नोव्हेंबर रोजी जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेस जबाबदार असलेला तलाठी पुंजाबा बिरारे याला अखेर निलंबित करण्यात आले. लोकमतने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने दखल घेत ही कारवाई केली. दरम्यान, या तलाठ्यावर  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत शेतक-याच्या कुटुंबाने केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग छगन सुंदर्डे या शेतक-याच्या नावावरील एक हेक्टर एक आर जमीन तलाठी बिरारे याने चौघांशी संगनमत करून परस्पर दुसºयाच्या नावावर केली होती. यामुळे भावसिंग यांनी अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेत आत्महत्या केली होती. यानंतर फुलंब्री पोलिसांनी आरोपी निहालसिंग वाळुबा सुंदर्डे, खुशालसिंग वाळुबा सुंदर्डे, महासिंग वाळुबा सुंदर्डे व परमजितसिंग धील्लो यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता; परंतु या घटनेस जबाबदार असलेला तलाठी बिरारे हा मोकाटच होता. याबाबत मयत शेतकºयाच्या मुलाने वारंवार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली; परंतु न्याय मिळत नव्हता.
औरंगाबादच्या तहसीलदारांनी केली चौकशी
या प्रकरणी लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. यावर महसूल विभागाने तलाठी बिरारे याचा पदभार काढून घेतला व चौकशी सुरू केली. औरंगाबादच्या तहसीलदारांनी चौकशी पूर्ण करून तलाठी पुंजाबा बिरारे याला दोषी ठरविले व तसा अहवाल उपविभागीय अधिकाºयांना सादर केला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे यांनी बुधवारी तलाठी पुंजाबा बिरारे याला निलंबित केले.

Web Title:  Talathi, who is responsible for farmer's suicide, is finally suspended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.