परभणी जिल्ह्यातील तलाठी बेमुदत संपावर

By Admin | Updated: April 26, 2016 23:48 IST2016-04-26T23:36:36+5:302016-04-26T23:48:52+5:30

परभणी : तलाठी सज्जा व महसूल मंडळांची पुनर्रचना करावी, यासह सात विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे.

Talathi stampede strike in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील तलाठी बेमुदत संपावर

परभणी जिल्ह्यातील तलाठी बेमुदत संपावर

परभणी : तलाठी सज्जा व महसूल मंडळांची पुनर्रचना करावी, यासह सात विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २६ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कामकाज ठप्प पडले आहे.
ग्रामस्थ आणि शासनाचा महसूल विभाग यांच्यातील दुवा म्हणून तलाठी काम करतात. या तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी परभणी जिल्हा तलाठी संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यापूर्वी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी मागण्या मान्य झाल्या नसल्याने परभणी जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तलाठी संवर्गातील नायब तहसीलदार अव्वल कारकून असे कर्मचारी २६ एप्रिलपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर गेले आहेत.
सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर कराव्यात, सर्व्हरची स्पीड वाढवावी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौण खनिज वसुलीच्या कामात तलाठी संवर्गाला वगळावे, तलाठी तसेच मंडळ अधिकारी कार्यालय बांधून द्यावे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावीत आदी मागण्या तलाठी महासंघाने केल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी तलाठी महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तलाठी संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत काजे, देवेंद्रसिंग चंदेल, एन.आर.सोनवणे, के.पी.शिंदे, आर.के. पोले, एम.आर. जाधव, डी.यू. बोधाडे, व्ही.एस.वाणी, पी.बी. राखे आदींची उपस्थिती होती.
या आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यातील २३८ तलाठी, ३२ मंडळ अधिकारी आणि तीन नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Talathi stampede strike in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.