शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
2
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
3
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
4
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
5
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
6
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
7
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
8
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
9
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
10
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
11
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
12
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
13
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
14
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
15
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
17
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
18
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
19
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
20
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, कोतवालास वाळू तस्करांची बेदम मारहाण, चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 16:53 IST

वाळू कारवाईत पोलीस व महसूल विभागात समन्वयाचा अभाव

पैठण: अवैध वाळू वाहतूकीवर कारवाईसाठी नेमलेल्या पथकातील तलाठी व कोतवालास बेदम मारहाण करून त्यांच्या ताब्यातील वाळुचे वाहन तस्करांनी पळवून नेले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रहाटगाव - आपेगाव रोडवर सोलनापूर येथे ही घटना घडली आहे. 

महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून वाळू तस्करावर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकरणातील चार वाळू तस्करांना  पोलीसांनी अटक केली आहे.  अवैध वाहतूक व गौणखनिज चोरीस प्रतिबंध करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार दररोज तीन कर्मचाऱ्यांचे फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. यानुसार सोमवारी रात्री बालानगर तलाठी रमेश फटांगडे, कोतवाल रवींद्र सोनटक्के यांचे पथक कार्यरत होते. खाजगी वाहनाने गस्त घालत असताना आपेगाव रहाटगाव रोडवर सोलनापूर गावाजवळ विनाक्रमांकाचे वाळू वाहतूक करणारे वाहन तलाठी रमेश फटांगडे व कोतवाल रवींद्र सोनटक्के यांनी अडवून चालकाकडे वाळू वाहतूक परवाना आहे का ? याबाबत चौकशी केली. 

परंतु, चालकाकडे काहीच कागदपत्रे नसल्याने वाळू भरलेले वाहन त्यांनी तहसील कार्यालयात घेण्यास चालकास सांगितले. तेवढ्यात चालकासह  अन्य दोघांनी  गाडीतून उतरून तलाठी व कोतवाला सोबत हुज्जत घालण्यास सुरवात केली. दरम्यान आणखी एकास फोन करून त्यांनी बोलावून घेतले. मोटारसायकलवर आलेल्या त्यांच्या साथीदाराने येताच तलाठी व कोतवालावर लाथा बुक्क्यांनी हल्ला केला. रात्रीच्या अंधारात मदतीस कुणी नसल्याने तलाठी व कोतवाल भेदरून गेले. मारहाण सुरू असताना चालकाने वाळूने भरलेले वाहन तेथून पळवून नेले. तलाठी कोतवालाने आरडाओरडा केल्याने वाळू तस्कर तेथून फरार झाले. 

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शंकर लाड यांनी घटनास्थळावर जात कोतवाल व तलाठी यांना घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी तलाठी रमेश फटांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  चार वाळू तस्करा विरोधात गौणखनिज अधिनियम, शासकीय कामात अडथळा, मारहान आदी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींना अटक...घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, यांनी पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले, गोपाळ पाटील, सचिन भुमे, स्वप्नील दिलवाले, नरेंद्र आंधारे,  सुधीर वाव्हळ,  यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. मंगळवारी दुपारी प्रतिक संजय भोज, शैलेश बाबासाहेब मानमोडे, विजय विष्णू घुले व मोहसीन मोईन शेख सर्व राहणार पैठण या चौघांना पैठण शहरातील विविध भागातून अटक केली असे पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले यांनी सांगितले.

समन्वयाचा अभाव...पैठण तालुक्यात वाळू तस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली १ मार्च, २०२२ रोजी झालेल्या  वाळू सनियंत्रण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. या नुसार रात्र पाळीच्या पथकासोबत एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी असेल असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु गेल्या काही महिण्या पासून पोलीस व महसूल विभागाचे पथक स्वतंत्र पणे अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई करत असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी रात्री झालेल्या पथका सोबत पोलीस असते तर पुढील घटना घडल्याच नसत्या... परंतु, वाळु कारवाई बाबतीत महसूल व पोलीसात एकमत नसल्याचेच समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस