शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हे घ्या पत्र,संभाजीराजेंना गणोजींनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत; 'छावा'वर शिर्केंचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:51 IST

ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली असतानाही 'छावा' चित्रपटात शिर्के घराण्याचा खोटा इतिहास दाखविला असल्याचा आक्षेप शिर्के घराण्याच्या तेराव्या पिढीतील वंशजाने घेतला आहे.

- दादासाहेब गलांडेपैठण : गणोजीराजे शिर्के यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पकडून दिले असल्याचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयात उपलब्ध नाहीत. ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली असतानाही 'छावा' चित्रपटात शिर्के घराण्याचा खोटा इतिहास दाखविला जात असल्याने आम्हाला खूप वेदना होत आहेत, अशी भावना शिर्के घराण्याच्या मुंगी पैठण शाखेच्या तेराव्या पिढीतील रामकृष्ण शिर्के यांनी व्यक्त केली.

'लोकमत'शी संवाद साधताना रामकृष्ण शिर्के म्हणाले की, छावा चित्रपटात गणोजीराजे शिर्के यांनी दगाफटका करून छत्रपती संभाजीराजेंना मोगलांना पकडून दिल्याचे दाखवले आहे. या चित्रीकरणाला शिर्के घराण्याचा आक्षेप आहे. शिर्के घराणे हे स्वराज्यासाठी विश्वासपात्र तसेच एकनिष्ठ होते. 'छावा' सिनेमातील प्रसंगामुळे राज्यासह देशात शिर्के घराण्याची जाणूनबुजून बदनामी केली जात आहे. ही बदनामी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

याबाबतचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन कार्यालयात उपलब्ध नाहीत ही बाब माहिती अधिकारात २७ जुलै २००९ ला उघड झालेली आहे. खरा इतिहास जनतेसमोर आणण्याची मागणीही शिर्के यांनी केली. 'छावा' चित्रपटाचे लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखकावर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी सातारा येथील सुहासराजे शिर्के यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस महासंचालकांकडे केल्याची माहिती रामकृष्ण शिर्के यांनी दिली.

काय म्हटले आहे पत्रात?पुराभिलेख संचालनालयाने रामकृष्ण शिर्के यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपला दि. १ जुलै २००९ रोजीचा अर्ज प्राप्त झाला असून याबाबत खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे. मुद्दा क्र. १. गणोजीराजे शिर्के यांनी संभाजीराजे यांना पकडून दिले असल्याचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे या कार्यालयात उपलब्ध नाहीत. या पत्रावर पुराभिलेख संचालनालयाचे संचालक डॉ. भास्कर घाटावकर यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजhistoryइतिहास