पैठण : पालकमंत्री या नात्याने पैठण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाबाबत उद्या (दि. १७) होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी येथे दिले. नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत कदम बोलत होते. नगर परिषदेतर्फे बांधण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कदम यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिवाजी चौकात जाहीर सभा घेण्यात आली. व्यासपीठावर खा. चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ. संदीपान भुमरे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, उपनगराध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, माजी आमदार अण्णासाहेब माने, राजू वैद्य, दिलीप थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, बाळासाहेब थोरात व पैठण न. प. चे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी रस्त्यासाठी निधी दिल्याबद्दल पालकमंत्री कदम यांचे आभार मानले. शहरातील उर्वरित रस्त्यासाठी आणखी तीन कोटींचा निधी द्यावा अशी मागणी केली.खा. चंद्रकांत खैरे, आ. भुमरे यांचे या वेळी भाषण झाले. सुरेश प्रभू, तुमचे मंत्रीपद जाईल सोलापूर जळगाव रेल्वे पैठणमार्गे न नेता ती जालनामार्गे नेण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा उल्लेख खा. खैरे यांनी केला होता. हाच मुद्दा धरत पालकमंत्री रामदास कदम यांनी खा. खैरे, तुमचे जर सुरेश प्रभू ऐकत नसतील, तर मला सांगा, कोकणी माणसाला कसे समजावायचे ते मला माहीत आहे, असे सांगत संत एकनाथ महाराज यांच्या गावाची रेल्वे पळवली, तर सुरेश प्रभू तुमचे मंत्रीपद जाईल, असा टोला कदम यांनी लगावताच जोरदार हशा पिकला.आ. भुमरे व दत्ता गोर्डे यांचे कौतुकआ. भुमरे स्वत:साठी काहीच मागत नाहीत. जे मागतात ते जनतेसाठीच. यामुळे आम्ही या माणसावर खूप प्रेम करतो. त्यांना मदत केली नाही तर पाप लागेल असे सांगत विकासासाठी निधी कसा काढून घ्यावा हे नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांना चांगले जमते असे सांगत हे दोघे पाहुणा म्हणून बोलावतात व चांगले कापतात; परंतु शिवसेनेत अशाच कार्यकर्त्यांची गरज आहे असे कदम यांनी सभेत उच्चारताच उपस्थितांतून जोरदार हशा पिकला. गर्दीमुळे कदम खुश सभेसाठी आज मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने कदम मोठे खुश झाले. सभेच्या गर्दीचा उल्लेख करीत गर्दीची सीडी काँग्रेसच्या नेत्यांना पाठवा, त्यांना झोप येणार नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमासाठी नगरसेवक मंगल मगर, शिल्पा पल्लोड, अर्चणा गव्हाणे, अजीम कट्यारे, अप्पासाहेब गायकवाड, ललिता पोरवाल, श्याम लोहिया, सुवर्णा रासणे, राखी परदेशी,राजू गायकवाड, सुधाकर तुपे, फाजल टेकडी, सोमनाथ भारतवाले, तुषार पाटील आदींसह मोठ्या संख्येने नागरिक हजर होते.रोपवाटिकेला पालकमंत्र्यांची भेट दौलताबाद : कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उद्घाटन करून पैठणकडे जाताना पालकमंत्री रामदास कदम यांनी दौलताबाद किल्ल्याजवळील रोपवाटिका व फॉरेस्ट पार्क ला अचानक भेट दिली. त्यांच्या सोबत खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे होत्या. त्यांनी रोपवाटिका व फॉरेस्ट पार्क ची पाहणी केली. येथील रोपाबद्दल माहिती घेतली. पुढे एक लाख फळझाडांची निर्मिती करण्याचे आदेश वन अधिकाऱ्यांना दिले, तर या रोपासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावेळी वनक्षेत्र अधिकारी एस.वाय.गवंडर,वन परिमंडल अधिकारी अनिल पाटील वन कर्मचारी उपस्थित होते.पोेलीस ठाणे इमारतीसाठी पाच कोटी कन्नड : येथील ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी लवकरच सुसज्ज इमारत उभारण्यात येईल़ त्याकरिता पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी केली़ यावेळी खा़ चंद्रकांत खैरे, आ़ हर्षवर्धन जाधव,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी, शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे,नरेंद्र त्रिवेदी,माजी आ़ अण्णासाहेब माने,नगराध्यक्ष संतोष कोल्हे,सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी सतीश माने,हर्ष पोद्दार (वैजापूर),प्रीतम यावलकर (कन्नड),स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सुनील नीळ,पो़नि़ शिवलाल पुरभे, सपोनि.प्रफुल्ल अंकुशकर,जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,विविध गावांचे सरपंच, चेअरमन,पोलीस पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. पो.नि. बाजीराव कुटे यांनी आभार मानले.दानवे यांना खैरेंचा चिमटापैठणमार्गे जाणारी रेल्वे जालनामार्गे नेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रयत्नशील असल्याचे सांगत, खा. खैरे यांनी, ‘दानवे, असे करू नका, तुम्ही पैठणचे खासदार आहात, नाहीतर पैठणची जनता तुम्हाला माफ करणार नाही,’ असा इशारा देत दानवे माझे मित्र आहेत, त्यांना मी बोलतो, असेही खा. चंद्रकांत खैरे यांनी या वेळी सांगितले.
ज्ञानेश्वर उद्यानाचा निर्णय आजच घेऊ
By admin | Updated: January 17, 2016 00:04 IST