शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'चटणी-भाकरी सोबत घ्या', २० जानेवारीला समाज बांधवांसह जरांगे पाटील मुंबईकडे पायी निघणार

By बापू सोळुंके | Updated: December 26, 2023 17:20 IST

सुमारे दहा लाख वाहनांतून समाज बांधव सोबत चटणी, भाकर घेऊन सहभागी होतील

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज कुणबी असल्याच्या एवढ्या मोठ्या नोंदी सापडल्या आहेत, आता या नोंदीचा आधार घेऊन राज्यसरकारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले पाहिजे, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, यासाठी मी २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईला पायी निघणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत चर्चा केली.

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  सरकारणे सांगितलं कायदा पारित करायला वेळ द्या, आम्ही नोंदी  कायदा पारित करायला ४० दिवस दिले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. अनेकदा सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे. यादीत क्रमांक ८३ ला तत्सम मराठा म्हणून उल्लेख आहे. परंतु सरकारकडून जाणून बुजून चालढकल करायचं काम सुरू असल्याचे दिसते. केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी आम्हाला आजपर्यंत आरक्षण दिले नाही. सर्वोच्च न्यायालयातून जुने आरक्षण मिळाले तरी ते आम्ही घेणारच आहोत. कारण ते आरक्षण आंदोलनातूनच मराठा समाजाला मिळाले होते. 

आमच्यावर कोयते, कुऱ्हाडी काढणारे संस्कृती काय संस्कृती शिकवताओबीसी नेते तथा राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेता जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका आमच्यावर कोयते ,कुऱ्हाडी काढण्याची भाषा करणारे मला संस्कृतीची भाषा काय शिकवणार? असा सवाल केला.  धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका  स्पष्ट करा म्हटल्यांवर कागद खाईल हा माणूस असेही जरांगे म्हणाले.

मीठ, मिरची सोबत घेऊन आपआपल्या वाहनांनी मुंबईला जायचे२० जानेवारी रोजी मुंबईला निघायचे आहे. मुंबईला निघताना प्रत्येक गावकऱ्यांनी स्वत:च्या जेवणाची   व्यवस्था करावी, यासाठी मीठ, मिरची सोबत घ्यावी,असे आवाहन जरांगे पाटील  यांनी समाजाला केले.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली भेटस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास जरांगे पाटील यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद