गोलवाडीतील चावडी पाडणाऱ्याविरुद्ध कारवाई करा
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:12+5:302020-12-04T04:12:12+5:30
निवेदनात म्हटले आहे की, गावातील मल्लाव समाजाची चावडी आठवडाभरापूर्वी सरपंच मनीषा धोंडरे व ग्रामसेवक अभिजित हारपले यांनी नियमबाह्यपणे पाडली. ...

गोलवाडीतील चावडी पाडणाऱ्याविरुद्ध कारवाई करा
निवेदनात म्हटले आहे की, गावातील मल्लाव समाजाची चावडी आठवडाभरापूर्वी सरपंच मनीषा धोंडरे व ग्रामसेवक अभिजित हारपले यांनी नियमबाह्यपणे पाडली. चावडी पाडण्यापूर्वी ग्रामसभा व समाजातील नागरिकांना विश्वास घेतले नाही. पदाचा गैरवापर करून चावडी पाडणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मल्लाव समाजाचे गंगाराम कणिसे, गिरधारी सलामपुरे, आसाराम सलामबाद, सांडू कणिसे, देवा सलामबाद, केशव सलामपुरे, राजू सलामपुरे, बंडू गिऱ्हे, ग्रामपंचायत सदस्या दीक्षा सलामपुरे, पार्वती गायकवाड, नंदिनी तिरछ, गोपाल सलामपुरे, शेख सुभान आदींनी केली.
------------------
घाणेगावात मटका अड्ड्यावर छापा
वाळूज महानगर : घाणेगाव शिवारात मटका अड्ड्यावर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरुवारी (दि.३)छापा मारून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत मटक्याचे साहित्य व रोख ६ हजार ८८० रुपये जप्त करण्यात आले .
घाणेगाव शिवारात कल्याण मटका सुरू असल्याची माहिती बातमीदाराने एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथकाने दुपारी ३ वाजेच्या सुमारास छापा मारला. मटका चालविणारा दादाराव देवरे व मटका खेळण्यासाठी जमा झालेले अर्जुन बन्सोडे, किशोर पवार (तिघेही रा.घाणेगाव) व सचिन खंडेराव (रा. विटावा) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम मोबाईल, असा एकूण ६ हजार ८८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
-------------------
दुचाकीच्या धडकेत महिला सुरक्षारक्षक जखमी
वाळूज महानगर : महिला सुरक्षारक्षकास पाठीमागून धडक देऊन जखमी करणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वैशाली संजय सिरसाठ (रा. घाणेगाव) या कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. गुरुवारी (दि.३) सायंकाळी ७ वाजता कंपनीतून सुटी झाल्यानंतर त्या कंपनीच्या बसमध्ये बसत असताना भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली व घटनास्थळावरून फरार झाला. कंपनीच्या रुग्णवाहिकेतून त्यांना बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार दुचाकीस्वाराविरुद्ध (एमएच २०, ईआर ५९४२) गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------------