तब्बल दोन तास पूजाची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:58 IST2017-07-26T00:56:08+5:302017-07-26T00:58:47+5:30

नांदेड: रक्ताच्या नात्यातील भावानेच गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडली तरीही रांगत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करणाºया महिलेची तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज सुरु होती़

tababala-daona-taasa-pauujaacai-martayauusai-jhaunja | तब्बल दोन तास पूजाची मृत्यूशी झुंज

तब्बल दोन तास पूजाची मृत्यूशी झुंज

ठळक मुद्देनागरिकांनी तिची मदत करण्याऐवजी मोबाईलवर या दृश्याचे चित्रीकरण करण्यालाच महत्व दिले़ भावानेच गळ्यावर केले़ धारदार शस्त्राने वारमदत मिळाली असती तर किमान तिचा जीव वाचला असता़

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: रक्ताच्या नात्यातील भावानेच गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडली तरीही रांगत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करणाºया महिलेची तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज सुरु होती़ परंतु संवेदना बोथट झालेल्या नागरिकांनी तिची मदत करण्याऐवजी मोबाईलवर या दृश्याचे चित्रीकरण करण्यालाच महत्व दिले़ बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़, परंतु महिलेच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही़ दोन तासानंतर या महिलेची प्राणज्योत मालवली़ या घटनेमुळे संवेदनाहीन समाजाचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले़
भोकर येथील नवविवाहिता पूजा हिचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते़ लग्नापूर्वी तीन वर्षे तिचे गावातीलच गोविंद कºहाळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते़ त्यातूनच २२ जुलै रोजी हे प्रेमी युगुल तेलंगणात पळून गेले होते़ ही बाब पूजाचा भाऊ दिगंबर दासरे याला समजल्यानंतर तो त्यांना आणण्यासाठी गेला़ भोकरकडे येत असताना दिगंबरने पूजा आणि गोविंद यांच्यावर कोयत्याने वार केले़ यामध्ये गोविंदचा जागीच मृत्यू झाला़ तर पूजाही मयत झाली असे समजून दिगंबर त्या ठिकाणाहून तडक भोकर ठाण्यात आला़, परंतु इकडे पूजामध्ये जीव होता़
रस्त्याच्या शेजारी झुडुपात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पूजा रांगतच रस्त्यावर आली़ रक्तस्त्राव अधिक झाल्याने तिला उठताही येत नव्हते़ रस्त्यावरच मदतीची याचना करीत ती पडली होती़ यावेळी रस्त्यावरुन जाणाºयांनी वाहने थांबविली, परंतु कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे येत नव्हता़ बघ्यांची गर्दी वाढतच होती़ तशी पूजाही मदतीसाठी सर्व शक्ती एकवटून हाताने इशारे करीत होती़ सर्व जोर लावून एकदाची ती उठून बसली़ यावेळी उपस्थितांनी तिला कुणी मारलं असा प्रश्नही केला? त्या प्रश्नांची उत्तरेही तिने दिली़ परंतु तिला मदत करण्याऐवजी जो-तो आपल्याजवळील मोबाईलमध्ये तिचे चित्रीकरण करण्यात गुंतला होता़ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने थांबली होती, परंतु यातील एकानेही तिच्या मदतीसाठी हात पुढे केला नाही़ शरीरातील त्राण संपल्यामुळे अखेर पूजाने रस्त्याच्या कडेलाच अखेरचा श्वास घेतला़ त्यानंतर बºयाच उशिराने घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली़ या सर्व घटनाक्रमात जवळपास दोन तास वेळ गेला़ जिवाच्या आकांताने तडफडणाºया पूजाचा हा अखेरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब पुढे आली़ पूजाला वेळीच मदत मिळाली असती तर किमान तिचा जीव वाचला असता़ अशी चर्चा होत आहे़

Web Title: tababala-daona-taasa-pauujaacai-martayauusai-jhaunja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.