तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:55 IST2019-01-17T18:55:21+5:302019-01-17T18:55:32+5:30
विना परवाना हातात तलवार घेवून दहशत पसरविणाºया तीसगाव येथील तरुणास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी रात्री जेरबंद केले.

तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्यास अटक
वाळूज महानगर : विना परवाना हातात तलवार घेवून दहशत पसरविणाºया तीसगाव येथील तरुणास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी रात्री जेरबंद केले. रमेश चव्हाण असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
बजाजनगरातील सिडको रस्त्यावर असलेल्या हॉटेल मराठा कंदुरी येथे मुसा शेख याच्यासोबत कोणीतरी वाद घालत असल्याची माहिती गस्तीवरील सहाय्यक फौजदार आर.डी. वडगावकर यांना मिळाली. घटनास्थळी जात मुसा शेख याच्याकडे चौकशी केली. तेव्हा रमेश चव्हाण हा विनाकारण शिवीगाळ करीत होता. सव्वाचार वाजेच्या सुमारास रमेश चव्हाण हातात तलवार घेवून तिथे आला. मात्र, पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच वडगावकर व त्यांच्या सहकाºयांनी रमेशला तलवारीसह ताब्यात घेतले. या प्रकरणी स. फौजदार आर.डी. वडगावकर यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात रमेश चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.