स्वरवसंत संगीत मैफलीस प्रतिसाद

By Admin | Updated: September 19, 2014 00:11 IST2014-09-18T23:48:24+5:302014-09-19T00:11:48+5:30

परभणी : रागदरीसह नाट्यगीत, भजन व भक्तीगीतांच्या स्वर-वसंत संगीत मैफलीस रसिकांनी प्रतिसाद दिला.

Swarovski music concert response | स्वरवसंत संगीत मैफलीस प्रतिसाद

स्वरवसंत संगीत मैफलीस प्रतिसाद

परभणी : रागदरीसह नाट्यगीत, भजन व भक्तीगीतांच्या स्वर-वसंत संगीत मैफलीस रसिकांनी प्रतिसाद दिला.
येथील राजाराम सभागृहात तालयात्री व संस्कृत भारती यांच्या वतीने स्व.अ‍ॅड.वसंतराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संगीत मैफलीचे नुकतेच आयोजन केले होते. लातूर येथील देवेंद्र कुलकर्णी यांच्या गायनाने परभणीकर मंत्रमुग्ध झाले. प्रारंभी सरस्वती राग गायला. त्यानंतर नाट्यगीत, कानडी भजन, भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम चांगलाच रंगला. यावेळी हार्मोनियमवर कृष्णराज लव्हेकर, तबल्यावर जयप्रकाश हरिदास तर तानपुऱ्यावर हनुमंत पांचाळ यांनी साथसंगत केली.
खा.बंडू जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.संजय टाकळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.यशवंत पाटील यांची उपस्थिती होती. संजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. किशोर पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किशोर विश्वामित्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Swarovski music concert response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.