‘स्वाराती’ला मिळाले गुरू !

By Admin | Updated: July 9, 2015 00:22 IST2015-07-09T00:22:26+5:302015-07-09T00:22:26+5:30

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिक्षकांची अनेक पदे रिक्त होते. या महिन्यात लोकेसवा आयोगामार्फत सहा

'Swarati' guru got! | ‘स्वाराती’ला मिळाले गुरू !

‘स्वाराती’ला मिळाले गुरू !


अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिक्षकांची अनेक पदे रिक्त होते. या महिन्यात लोकेसवा आयोगामार्फत सहा तर पदोन्नतीवर १७ अशा एकूण २३ वैद्यकीय शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याने रुग्णसेवेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या सात वर्षांपासून एकलव्याप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षकांची ३६ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त होती. प्रशासकीय पातळीवर लाल फितीच्या कारभारामुळे या नियुक्त्या रखडल्याने याचा मोठा फटका वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी व रुग्णसेवेला सहन करावा लागत होता. मात्र या महिन्यात प्रशासनाच्या वतीने २३ रिक्त पदांवर डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या सर्व वैद्यकीय शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्यामुळे एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा फायदा झाला आहे. गेली अनेक वर्षे वैद्यकीय शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना एकलव्याप्रमाणे शिक्षण घेण्याची वेळ आली होती. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक जागा वैद्यकीय शिक्षकांअभावी कमी होऊ लागल्या होत्या. याचा परिणाम रुग्णसेवेसह प्रशासनावरही होत होता. मात्र वर्षानुवर्षे रखडलेल्या २३ डॉक्टरांच्या नियुक्त्या झाल्याने या वैद्यकीय महाविद्यालयास व रुग्णालयास चांगले दिवस आले आहेत.

Web Title: 'Swarati' guru got!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.