तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: April 13, 2015 00:46 IST2015-04-13T00:35:57+5:302015-04-13T00:46:16+5:30

मंठा : तालुक्यातील पिंपळखेडा बु. येथील सुभाष रूपासिंग राठोड (३८) या तरूणाचा शनिवारी सायंकाळी विहिरीत पडल्याने संशयास्पद मृत्यू झाला.

Suspicious death of the youth | तरुणाचा संशयास्पद मृत्यू

तरुणाचा संशयास्पद मृत्यू


मंठा : तालुक्यातील पिंपळखेडा बु. येथील सुभाष रूपासिंग राठोड (३८) या तरूणाचा शनिवारी सायंकाळी विहिरीत पडल्याने संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस उशिराने आल्याने तसेच रुग्णालयात ही शवविच्छदन करणारा सहाय्यक (कटर) नसल्याने ताटकळत बसलेल्या नातेवाईकांचा उद्रेक झाला. त्यांनी रूग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. व जो पर्यंत दिरंगाई करणाऱ्या पोलिस व डॉक्टरांवर कारवाई होणार नाही. तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही. असा इशारा देवून नातेवाईकांनी प्रेत रूग्णालयात सोडून गावाकडे निघून गेले.
सुभाष राठोड यांचा गावा लगतच्या विहीरीत प्रेत आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी मंठा पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी पंचनामा करून रविवारी दुपारी २ वाजता प्रेत शवविच्छदनासाठी मंठा ग्रामीण रूग्णालयात आनले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहेत्रे हे हजर होते. मात्र शवविच्छेदन करणारा सहाय्यक (कटर) उपलब्ध नव्हता. त्यामुळे नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले. शेवटी रूग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबधीतांवर कारवाईची मागणी केली. (वार्ताहर)
मंठा रूग्णालयातील शवविच्छेदन करणारा कटर सेवानिवृत्त झाल्याने ते पद रिक्त आहे. त्यामुळे परतूर येथून कटरला बोलावून शवविच्छदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रात्र झाल्याने सोमवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉ. मेहेत्रे यांनी सांगितले.
४पोलिसांनी घटनास्थळी येण्यास उशिर केल्याने तसेच डॉक्टरांनीही शवविच्छेदना उशिर केल्याने त्यांच्या कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान माहिती उशिरा मिळाल्याचे पोउपनि. चरभरे यांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.