शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

निलंबन चालेल, परंतु चौकशीचा ससेमिरा नको; एसीबीच्या धाकामुळे अनेक कर्मचाऱ्यांची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:43 IST

लाचखोर निलंबित अपर तहसीलदार नितीन गर्जे एक महिन्यापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे संशयकल्लोळ वाढला आहे.

छत्रपती संभाजीनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चोर सोडून संन्याशांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याची भावना बळावल्यामुळे अनेक कर्मचारी-अधिकारी कामावरच येत नसल्याचे चित्र आहे. अपर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामावर येत नाहीत. निलंबित केले तरी चालेल, परंतु चौकशीचा ससेमिरा मागे नको, अशी भूमिका अनेकांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

निलंबित अपर तहसीलदार नितीन गर्जे एक महिन्यापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे संशयकल्लोळ वाढला आहे. १५ मे रोजी एसीबीची कारवाई झाली होती. गर्जेसाठी पैसे घेताना नितीन चव्हाण व अन्य एक जण अडकला होता. त्यानंतर २७ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिराेळकर बडी रक्कम घेताना पकडला. दिलीप त्रिभुवन हा लिपिकही सोबत अडकला. २४ रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे सापळ्यात अडकली.

कर्मचारी काय सांगतात?गर्जे पसार आहे, त्यात आम्हाला काही माहिती नाही. ज्यांचा संबंध नाही. त्यांना देखील एसीबीचे अधिकारी धाक दाखवित आहेत. गेल्या महिन्यात चौकशीमुळे एका अधिकाऱ्याचा रक्तदाब वाढल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे बंद केल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. लाच प्रकरणात कुणी अडकले की थेट वरिष्ठांसाठी रक्कम घेत असल्याचे लाचखोर सांगतात. परंतु त्यात किती तथ्य आहे, याची शहानिशा होण्यापूर्वीच एसीबीकडून संबंधितांच्या चौकशीचे सत्र सुरू होते. वरिष्ठ आणि लाच घेणारा यांच्यात कधी बोलणे का, लेखी काही पुरावा आहे काय, एसएमएस चॅटींग, मध्यस्थ कुणी होता की नव्हता. या बाबी समोर आणण्यासाठी एसीबीकडून चौकशी होत आहे.

खिरोळकर प्रकरणात पुढे काय?निलंबित निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या प्रकरणात एसीबीने त्या विभागातील संबंधितांची चौकशी का केली नाही, अशी चर्चा प्रशासनात आहे. तसेच त्याचा पंटर के. एम. कोण आहे, त्याला ताब्यात घेऊन विचारणा का केली नाही?, किती प्रकरणे खिरोळकरने मंजूर केली?, ती कुणाची होती? याची चौकशी सध्या सुरू आहे. चौकशीअंती वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये किती जमिनीची प्रकरणे मंजूर झाली, हे समजेल. शहरातील एका उद्योजकाची संचिका मंजूर करण्यासाठी मोठा व्यवहार झाला होता. परंतु, लाच प्रकरण घडल्यामुळे तो व्यवहार अर्धवट राहिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी