शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी ACP विशाल ढुमेचे निलंबन; गृह विभागाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 17:10 IST

एसीपीचे कारमध्ये महिलेशी अश्लील चाळे; पती आणि दीराला मारहाण, सासूलाही शिवीगाळ

औरंगाबाद: गेल्या शनिवारी मध्यरात्री औरंगाबाद शहर एक खळबळजनक प्रकार घडला. पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त  विशाल ढुमे याने दारुच्या नशेत धावत्या कारमध्ये मित्राच्या पत्नीशी अश्लील चाळे केले. यानंतर त्यांच्या घरी जाऊन पती, दीर आणि सासूलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यानंतर शहरात विशाल ढुमेच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली. अखेर गृहविभागाने विशाल ढुमेचे निलंबन केले आहे.

महिलेच्या विनयभंगाप्रकरणी सोमवारी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ढुमेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. ढुमेने जामिनासाठी अर्ज सादर केला असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांनी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सोमवारी जामीन मंजूर केला. 

यानंतर शहरात ढुमेच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली. शहरातील नागरिकांसह खासदार इम्तियाज जलील आणि इतर लोकप्रतिनिधींनीही सरकारकडे विशाल ढुमेच्या निलंबनाची मागणी केली. अखेर आज गृह विभागाने आदेश काढून विशाल ढुमेला निलंबित केले आहे. शासन आदेशानुसार, 16 जानेवारीपासून ढुमेचे शासन सेवेतून निलंबन करण्यात आले आहे.

त्या रात्री काय घडलं?पीडिता पती, मुलीसह सिडको परिसरातील पाम रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता जेवण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी सहायक आयुक्त विशाल ढुमे हे मित्रासह जेवणासाठी आले होते. पीडितेच्या पतीची ढुमेसोबत ओळख होती. यावेळी ढुमेनी पीडितेच्या पतीला पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली. मध्यरात्री 1 वाजून 45 वाजता सर्व जण पोलिस आयुक्तालयाकडे निघाले. पीडिता समोरच्या सीटवर मुलीसह बसली होती, तर पती गाडी चालवत होता. 

ढुमे मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी मागूनच पीडितेसोबत अश्लील चाळे सुरू केले. तेव्हा पीडितेने त्यास दूर लोटले. पोलिस आयुक्तालय आल्यानंतर ते न उतरता पीडितेच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर पीडितेच्या बेडरुममधील वॉशरूम वापरण्यासाठी आग्रह धरला. पीडितेच्या पतीने त्यांना समजावून सांगत घरी जाण्याची विनंती केली. मात्र, ढुमेने पीडितेच्या पतीला मारहाण केली. यावेळी ढुमेने इमारतीत खूप गोंधळ घातला. यानंतर पीडितेच्या पतीने 112 नंबरला फोन करुन पोलिस बोलावून घेतले. पोलिस कर्मचारी ढुमेला गाडीत घेऊन गेले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस