जि.प.त चौघे निलंबित
By Admin | Updated: December 17, 2015 23:48 IST2015-12-17T23:45:15+5:302015-12-17T23:48:28+5:30
हिंगोली : कामातील अनियमितता, बैठकांना गैरहजेरी आदी अनेक विषयांचा ठपका ठेवत वसमत तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल आहे.

जि.प.त चौघे निलंबित
हिंगोली : कामातील अनियमितता, बैठकांना गैरहजेरी आदी अनेक विषयांचा ठपका ठेवत वसमत तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल आहे.
ग्रामसेवकांच्या मासिक बैठकीत वारंवार तक्रारी झाल्यानंतरही विविध बाबींचा आढावा सादर न करणे तीन ग्रामसेवकांना चांगलेच महागात पडले. कामांचे अभिलेख अद्यायावत करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनाही केराची टोपली दाखविली जात होती. त्यांनी संबंधितांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यात सोन्ना त. हट्टा येथील एस.एन. शिंदे, सावंगी बु. ब्राह्मणवाडा येथील ग्रामसेविका ए.बी.इंगळे, हयातनगर येथील ग्रामसेविका एस.एन. मुकाने यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. बैठकांना अनुपस्थिती, मुख्यालयी न राहणे, शौचालय बांधकाम, स्वच्छताविषयक कामे, दलित वस्ती, प्रिया सॉफ्ट, संग्राम कक्ष, मग्रारोहयोची कामे न करणे आदी विषयांचा ठपका ठेवण्यात आला आहे. (जि.प्र.)