दैठण्यात परतवारीची जय्यत तयारी

By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:56:30+5:302014-07-22T00:17:39+5:30

दैठणा: आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून अनेक दिंड्या पंढरपूरला जातात. पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात दैठणा येथील दत्ताबुवांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर वारी पूर्ण होते.

Survival of the return to the city | दैठण्यात परतवारीची जय्यत तयारी

दैठण्यात परतवारीची जय्यत तयारी

दैठणा: आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून अनेक दिंड्या पंढरपूरला जातात. पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात दैठणा येथील दत्ताबुवांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर वारी पूर्ण होते. २२ जुलै रोजी एकादशीनिमित्त दैठणा येथे परतवारीची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा येथे दत्ताबुवा यांची समाधी आहे. यामुळे या गावाला धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जणारे वारकरी परतीच्या प्रवासानंतर दैठणा येथील दत्ताबुवा यांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि वारीची सांगता होते. दत्ताबुवा यांच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतरच वारी पूर्ण झाल्याचे समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. परिसरातील पोखर्णी, साळापुरी, सायाळा आदी ठिकाणाहून हरिनामाचा गजर करीत पायी दिंड्याही गावात येतात. या दिंड्याचे स्वागत व फराळाची व्यवस्था धिरज गिरी मठात केली जाते. तर गावातील प्रवेशद्वार व हनुमान मंदिर या ठिकाणी चहा-पानाची व्यवस्था केली जाते. या दिवशी सुमारे १५ ते २० हजार भाविक दत्ताबुवाच्या समाधीचे दर्शन घेतात. (वार्ताहर)
प्रत्येक वारकरी अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही कायम आहे. परतवारीची गावात जय्यत तयारी सुरु झाली आहे. या दिवशी गावातील युवक मंडळाच्या पुढाकाराने वारकऱ्यांना चहा, पाणी आणि फराळाची व्यवस्था केली जाते. सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा उत्सव गावात चालतो.

Web Title: Survival of the return to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.