रसिकांचा उदंड प्रतिसाद थक्क करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:04 IST2021-02-07T04:04:57+5:302021-02-07T04:04:57+5:30

'तू म्हणशील तसं' या नाटकाविषयी सांगताना संकर्षण म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या घरातील वाटावी, अशी ही कहाणी आहे. यामध्ये आदिती ...

Surprising response from the audience | रसिकांचा उदंड प्रतिसाद थक्क करणारा

रसिकांचा उदंड प्रतिसाद थक्क करणारा

'तू म्हणशील तसं' या नाटकाविषयी सांगताना संकर्षण म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या घरातील वाटावी, अशी ही कहाणी आहे. यामध्ये आदिती - गौरव या वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या जोडप्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. एकाच बँकेत काम करणारे हे जोडपे असून, बँकेत आदिती ही गौरवची बॉस आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यात होणारे वाद-विवाद, रुसवे-फुगवे आणि एकंदरीतच सगळी धमाल या नाटकात दाखविण्यात आली आहे.

चौकट :

आपलीच वाटावी अशी कहाणी

'तू म्हणशील तसं' हे असे एक वाक्य आहे, जे प्रत्येक जोडीदाराला आयुष्यात अनेकदा म्हणावेच लागते. लग्नाला १ वर्ष झाले असो किंवा २५ वर्षे हाेवो, या वाक्याची साथ सुटत नाही. त्यामुळेच तर नाटकाला आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांना ही आपलीच कहाणी आहे, असे वाटते आणि नकळतच रसिक त्याच्याशी जोडले जातात, असे संकर्षण यांनी सांगितले.

सूचना-

तू म्हणशील तसं या नाटकाचा फोटो आहे.

Web Title: Surprising response from the audience