शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

आश्चर्यच ! यंदा लाचखोरांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट; भ्रष्टाचारात छत्रपती संभाजीनगर राज्यात तिसरे

By सुमित डोळे | Updated: December 25, 2024 18:33 IST

कोरोनाचे वर्ष वगळता पहिल्यांदाच दहा वर्षांत सर्वाधिक कमी ७०१ कारवाया, १३१६ कारवायांसह २०१४ ठरले होते सर्वाधिक लाचखोरीचे वर्ष

छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्यांच्या कामांसाठी होणाऱ्या लाचखोरीत यंदा घट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात १५ टक्क्यांनी यंदा कारवाईत घट झाली आहे. राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे २०२० चे वर्ष वगळता दहा वर्षांमध्ये सर्वाधिक कमी ७०१ लाचखोर अडकले गेले. १३१६ कारवायांसह २०१४ हे सर्वाधिक लाचखोरीच्या कारवायांचे वर्ष ठरले होते.

गलेगठ्ठ पगार, अन्य सोयीसुविधा असतानाही शासकीय अधिकारी, कर्मचारी अधिकच्या पैशांच्या हव्यासापोटी अडकले जातात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने कारवाया होतानादेखील लाचखोरांचे प्रमाण कायम राहत आले होते. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत २०२४ मध्ये २२ डिसेंबरपर्यंत सापळे, अपसंपदा व भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक कमी ७०१ कारवायांची नोंद झाली आहे. मात्र, सापळ्यात रंगेहाथ सापडूनही संबंधित विभागांकडून निलंबनाच्या कारवाईत दिरंगाई केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात अद्यापही २७ लाचखोरांचे निलंबन बाकी असून, यात सर्वाधिक ग्रामविकास खात्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे.

परिक्षेत्रात संभाजीनगरात अधिकजिल्हा - सापळे - २०२४ (२२ डिसेंबर अखेर)- २०२३छत्रपती संभाजीनगर - ४१ - ४६जालना - २२ - २७बीड - २२ - २६धाराशिव - २४ - २६

राज्यात तिसऱ्या क्रमांकावर कायमलाचखोरीत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र २०२४ मध्येदेखील सापळे, अपसंपदा व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

परिक्षेत्र - प्रकरणनाशिक - १४७पुणे - १४३छत्रपती संभाजीनगर - ११२ठाणे - ७०अमरावती - ६८नागपूर - ६२नांदेड - ६१मुंबई - ३८

कोरोनानंतर सर्वाधिक कमी २०२४ मध्येचवर्षे - एकूण गुन्हे२०१४ - १३१६२०१५ - १२७९२०१६ - १०१६२०२० - ६६३२०२३ - ८१२२०२४ - ७०१६

‘महसूल’मध्ये सर्वाधिक लाचखोरलाच घेण्यात दहा वर्षांपासून महसूल विभाग सर्वोच्च स्थानी राहिला आहे. राज्यभरात या विभागाच्या १७६ सापळ्यांत ३४ लाख ४४ हजार ९८० रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. त्या खालोखाल १३३ पोलिस, ६६ पंचायत समिती, ४० जिल्हा परिषद, ३७ कारवाया शिक्षण विभागात झाल्या.

साहेबांसाठी ‘क्लास थ्री’च तोफेच्या तोंडीहजारो, लाखो रुपयांची लाच घेताना सर्वाधिक ४९९ लाचखोर हे वर्ग ३ चेच अडकले गेले. त्या खालोखाल वर्ग ४ चे ४७, वर्ग २ चे ९८ तर वर्ग १ चे म्हणजेच ६२ साहेब लाच घेताना रंगेहाथ सापडले.

ऑनलाइनही करा तक्रारकुठल्याही शासकीय विभागात लाच मागून त्रास दिला जात असेल तर तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या https://www.acbmaharashtra.gov.in/bribe-complaint या संकेतस्थळावर त्याची थेट तक्रार करू शकता. शिवाय, १०६४ या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी