बीड : जिल्हा परिषदेचे सीईओ नामदेव ननावरे यांनी शनिवारी शहर परिसरातील शाळांना सरप्राईज भेटी दिल्या. त्यांच्या भेटीने शिक्षकांची धांदल उडाली.शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच सीईओ ननावरे हे बार्शी नाका परिसरातील आंबेडकर नगरातील जि.प. शाळेत धडकले. या शाळेत केवळ ८ विद्यार्थी अन् दोन शिक्षक आढळले. शाळेची पाहणी, पटसंख्या याची माहिती घेऊन ननावरे तेथून इमामपूरकडे रवाना झाले. इमापूर शाळेला भेट दिल्यावर ते शिंदेवस्तीवरील शाळेत गेले. तेथे फक्त २ शिक्षक आणि २ शिक्षक दिसून आले. वांगी, गितेवस्तीवरील शाळांमध्येही ननावरे यांनी भेटी दिल्या. दरम्यान, जाधववस्तीकडे चारचाकी जात नव्हती त्यामुळे ननावरे हे एका शिक्षकाच्या दुचाकीवरुन तेथे गेले. सीईओ चक्क दुचाकीवरुन शाळेत आल्याने शिक्षकांच्या भुवया उंचावल्या. (प्रतिनिधी)४आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात ८३३ शिक्षक आले आहेत़४शनिवारी हा आकडा बाहेर आला़ ४बदल्यातील आर्थिक उलाढालीची चर्चाही जोरात आहे़४काही शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्रे मिळविलेली आहेत़ मात्र सीईओ नामदेव ननावरे यांनी ती रद्द केली आहेत़
सीईओंकडून शाळांना ‘सरप्राईज’ भेटी
By admin | Updated: December 20, 2014 23:35 IST
बीड : जिल्हा परिषदेचे सीईओ नामदेव ननावरे यांनी शनिवारी शहर परिसरातील शाळांना सरप्राईज भेटी दिल्या. त्यांच्या भेटीने शिक्षकांची धांदल उडाली.
सीईओंकडून शाळांना ‘सरप्राईज’ भेटी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}