शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ओ, नातेवाईक, शस्त्रक्रिया झाली, रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात न्या! घाटी रुग्णालयात वेगळाच पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:35 IST

स्ट्रेचर ढकलण्याबरोबर घाटीतील अस्वच्छ, जागोजागी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांचाही ताप नातेवाइकांना सहन करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : उपचारासाठी रुग्णाला दाखल करताना घाटीत नातेवाइकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रियागृहातून रुग्णाला वाॅर्डात नेताना नातेवाइकांनाच स्ट्रेचर ढकलावे लागत आहे. स्ट्रेचर ढकलण्याबरोबर घाटीतील अस्वच्छ, जागोजागी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांचाही ताप नातेवाइकांना सहन करावा लागत आहे.

घाटीत रात्रीच्या वेळी नातेवाइकांनाच स्ट्रेचर ढकलावे लागत असल्याबाबत आणि स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेसंदर्भातील व्हिडीओ शनिवारी सामाजिक माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. यात महिला, पुरुष नातेवाईक रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वाॅर्डात घेऊन जात असल्याचे दिसते. घाटीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतरही संबंधित रुग्णाला वॉर्डात नेण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे अनेक वाॅर्डांतील स्वच्छतागृहांची अवस्था वाईट झाली आहे. त्याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावेवाॅर्ड क्र. १२ मधील स्वच्छतागृहातील फरशा तुटलेल्या आहेत. त्यातच पाणीही साचले आहे. त्यामुळे तेथून ये-जा करणेही अशक्य होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला नातेवाइकांनाच स्ट्रेचरवरून वाॅर्डात घेऊन जावे लागते. ही जबाबदारी रुग्णालयातील मामा, मावशी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी पार पाडली पाहिजे.- रेखा आढाव, रुग्णाचे नातेवाईक

बांधकाम विभागाला सूचनास्वच्छतागृहासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. सा. बां. विभाग त्यावर काम करत आहे. वॉर्डातील कर्मचाऱ्यांना दररोज स्वच्छता करण्याची सूचना केली आहे.- डाॅ. गायत्री तडवळकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर