शस्त्रक्रियागृह पाच महिन्यांपासून बंद !
By Admin | Updated: January 15, 2017 01:07 IST2017-01-15T01:05:56+5:302017-01-15T01:07:06+5:30
येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रियागृह मागील पाच महिन्यांपासून बंद आहे़

शस्त्रक्रियागृह पाच महिन्यांपासून बंद !
दत्ता पवार येडशी
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रियागृह मागील पाच महिन्यांपासून बंद आहे़ परिणामी शस्त्रकिया बंद पडल्या असून, रूग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ रूग्णालय इमारतीचा दोन ठिकाणी स्लॅब कोसळला असून, रूग्णांसह नातेवाईकांचा जीव धोक्यात आला आहे़
येडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे १९८५ साली बांधकाम झाले आहे़ या केंद्रांतर्गत येडशी, जवळा, कुमाळवाडी, आळणी, शिंगोली, गडदेवदरी, जहागीरदारवाडी, उपळा, जहागीरदारवाडी तांडा आदी दहा दहा गावातील नागरिकांना आरोग्याची सेवा देण्यात येते़ येथील बाह्यरूग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कुटूंब नियोजन, गरोदर माता महिला व बालकांना लसीकरणासह राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या लहान मोठ्या अपघातातील जखमींना इथे उपचारासाठी आणले जाते़ या आरोग्य केंद्राला गतवर्षी आनंदबाई जोशी पुरस्कार ने गौरवण्यात आले आहे. अशा या पुरस्कारप्राप्त रूग्णालयाला आता उतरती कळा लागली आहे. गत चार ते पाच महिन्यांपासून येथील शस्त्रक्रियागृह बंद असल्याने येथील शस्त्रक्रिया उस्मानाबाद येथे होत आहेत़ यामुळे येथे कुटंूब नियोजन शस्त्रकिया बंद असल्याने शस्त्रकिया केल्याला महिलांना किमान सात दिवस दवाखान्यात राहावे लागते़ येथील शस्त्रक्रिया बंद असल्याने महिलांसह नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ तसेच बाहेरील पोर्च मध्ये स्लॅबची खालील बाजू कोसळू लागली आहे. यातील कुजलेले लोखंड ही उघडे पडू लागले असून, हा स्लॅब कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे रूग्णांसह कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे़ येथे केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असून, उपचारासाठी येणाऱ्या महिला रूग्णांची संख्या पाहता महिला डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे़.