राष्ट्रीय योगा पंच परीक्षेत सुरेश मिरकर उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:58 IST2017-11-29T22:58:36+5:302017-11-29T22:58:52+5:30
कर्नाटकमधील धर्मस्थल येथे झालेल्या जागतिक योगा फेस्टिव्हल व दुसºया राष्ट्रीय योगा फेडरेशन चषकादरम्यान झालेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत औरंगाबादचे सुरेश मिरकर उत्तीर्ण झाले आहेत.

राष्ट्रीय योगा पंच परीक्षेत सुरेश मिरकर उत्तीर्ण
औरंगाबाद : कर्नाटकमधील धर्मस्थल येथे झालेल्या जागतिक योगा फेस्टिव्हल व दुसºया राष्ट्रीय योगा फेडरेशन चषकादरम्यान झालेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत औरंगाबादचे सुरेश मिरकर उत्तीर्ण झाले आहेत. योगा फेडरेशन आॅफ इंडियातर्फे आयोजित या पंच परीक्षेत देशभरातील ६० परीक्षार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होणारे सुरेश मिरकर हे पहिले पंच ठरले आहेत. या यशाबद्दल सुरेश मिरकर यांचे औरंगाबाद जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावने, योगा फेडरेशन आॅफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे सचिव चंद्रकांत पांगारे, राज्य योगा संघटनेच्या कार्याध्यक्षा अनिता पाटील, डॉ. वाय.एस. खेडकर इंटरनॅशनल स्कूलचे पी.के. सिब्बी यांनी अभिनंदन केले आहे.