बाजारपेठेत फळे-भाज्या, दुधाचा पुरवठा सुरळीत

By Admin | Updated: June 7, 2017 00:28 IST2017-06-07T00:28:05+5:302017-06-07T00:28:37+5:30

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सहाव्या दिवशी शहरात आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले.

The supply of fruits, vegetables and milk to the market is smooth | बाजारपेठेत फळे-भाज्या, दुधाचा पुरवठा सुरळीत

बाजारपेठेत फळे-भाज्या, दुधाचा पुरवठा सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सहाव्या दिवशी शहरात आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले. जाधववाडीत पहाटे ११८ टेम्पो, ट्रक फळे व भाज्या दाखल झाल्या. तसेच सव्वा लाख लिटरच्या जवळपास दुधाचाही पुरवठा झाला.
कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी जाधववाडीत काही व्यापाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींना मारहाण केली होती. यामुळे जाधववाडीत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याने फळभाजीपाल्यांचा पुरवठा सुरळीत झाला होता; पण काल सोमवारी राज्यव्यापी बाजारपेठ बंदचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला होता. यास काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. यामुळे जाधववाडीत शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येऊन दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. मुख्य बाजारपेठ बंद राहिल्याने त्याचा शहरातील भाजीमंडईतील आवकवर परिणाम झाला होता; पण मंगळवारी शहरातील आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवले. जाधववाडी बाजारपेठेत मध्यरात्रीपासून फळे व भाज्या घेऊन ट्रक टेम्पो दाखल होऊ लागले होते. सकाळी नेहमीप्रमाणे फळभाज्यांचा अडत बाजार भरला होता; पण शेतकऱ्यांची (पान ५ वर)

Web Title: The supply of fruits, vegetables and milk to the market is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.