सुपरवायझरची कामगाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:31 IST2019-03-28T22:31:29+5:302019-03-28T22:31:40+5:30
केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगाराला दोघा सूपरवायझरनी मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री विटावा फाटा येथे घडली.

सुपरवायझरची कामगाराला मारहाण
वाळूज महानगर : केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगाराला दोघा सूपरवायझरनी मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री विटावा फाटा येथे घडली. राजेंद्र कदम (२२) असे जखमीचे नाव आहे.
राजेंद्र कदम हा अजिंक्य इंटरप्रायजेस या कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारामार्फत वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीत काम करीत होता. काम करीत असताना पायाला मार लागल्याने राजेंद्रने काम सोडून दिले. दरम्यान, २६ मार्च रोजी राजेंद्र हा केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी ठेकेदाराच्या कार्यालयात गेला. यावेळी पैशावरुन सूपर वायझर दीपक व गोपाळ (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासोबत वाद झाल्याने राजेंद्र तेथून निघून घरी गेला.
दरम्यान, राजेंद्र हा विटावा फाटा येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास उभा असताना गोपाळ व दीपक यांनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. यात राजेंद्र हा जखमी झाला आहे. राजेंद्रला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सूपर वायझर गोपाळ व दीपक याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.