शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

नायलॉन मांजाविरुद्ध सुओमोटो याचिका; विकणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याचे खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 5:07 PM

Suomoto petition against nylon thread in Aurangabad Highcourt नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने सुओमोटो याचिका दाखल

ठळक मुद्दे गुरुवारी पतंगाच्या दुकानावर धाडी टाकण्याचे आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

औरंगाबाद : पतंगाच्या दुकानावर गुरुवारी (दि.३१) दिवसभरात धाडी टाकण्याचे आणि नायलॉन मांजा सापडल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्या. रवींद्र व्ही.घुगे आणि न्या .व्ही.व्ही.कंकणवाडी यांच्या खंडपीठाने पोलीस प्रशासनास दिले. 

दिवसभरात किती नायलॉन मांजा जप्त केला याचा अहवाल सादर करा. तसेच नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. अ‍ॅड. सत्यजित बोरा यांची न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून नेमणूक केली आहे . याचिकेवर १ जानेवारीला सुनावणी होणार आहे . नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिलेचा गळा चिरल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातमीची खंडपीठाने ३० डिसेंबरला स्वतःहून दखल घेतली होती .

राज्य शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे .राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाने जुलै २०१७ पासून देशभरात नायलॉन मांजावर बंदी घातली आहे .नायलॉन मांजामुळे असंख्य पक्षी जखमी होतात असे पक्षीतज्ञ् दिलीप भगत यांनी म्हटल्याचा उल्लेख खंडपीठाने केला आहे. याचिकेत राज्य शासन , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी ,पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि मनपा प्रशासक यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. मुख्य सरकारी वकील डी.आर.काळे आणि सहायक सरकारी वकील यादव लोणीकर प्रतिवाद्यांतर्फे , मनपातर्फे अ‍ॅड. आनंद भंडारी काम पाहत आहेत. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठkiteपतंगCrime Newsगुन्हेगारी