उन्हाचा कडाका अन लग्नांचा धडाका !

By Admin | Updated: May 15, 2014 00:04 IST2014-05-14T22:54:00+5:302014-05-15T00:04:25+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात सध्या जिल्हाभर लग्नकार्याचा अक्षरश: धुमधडाका सुरु आहे़

Summer clashes un-married! | उन्हाचा कडाका अन लग्नांचा धडाका !

उन्हाचा कडाका अन लग्नांचा धडाका !

व्यंकटेश वैष्णव , बीड मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात सध्या जिल्हाभर लग्नकार्याचा अक्षरश: धुमधडाका सुरु आहे़ पाणीटंचाईचा फटका लग्नसमारंभांनाही बसत असून उन्हाच्या काहिलीत वºहाडी मंडळी घामाघूम होत आहे़ सुईपासून ते टीव्हीपर्यंच्या वस्तूंची जमवाजमव करण्यात वधूपिते व्यस्त आहेत तर वरपित्यांचीही याहून वेगळी स्थिती नाही़ दरम्यान, वाढत्या महागाईने वधू- वर पित्यांचेही खिसे हलके होऊ लागले आहेत़ ‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणत अनेक घरांमध्ये सध्या भिंतीच्या रंगरंगोटीपासून खरेदीची लगबग सुरु आहे़ मे महिना सुरू असल्याने सूर्य आग ओकत आहे़ मागील दोन दिवसात उन्हाची तीव्रता ४० अंशाच्या वर गेलेली आहे़ मात्र या उन्हाची तमा न बाळगता वधू, वर पिता-व नातेवाईक बस्त्यापासून ते दागिने खरेदीत व्यस्त आहेत़ एकीकडे उन्हाचा कडाका तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब याचा सामना लगीनघाई असलेल्या मंडळींना करावा लागत आहे़ स्वयंपाकासाठी आचारी, लग्न लावण्यासाठी भटजी, बँडवाला, मंडपवाला आदी गोष्टी नवरदेवाकडील मंडळीच्या मनासारख्या झाल्या पाहिजेत यासाठी सगळी जुळवा- जुळव करण्यासाठी वधू पित्याची पळापळ सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत सर्वच लग्न साहित्यांत ३० ते ४० टक्के वाढ झालेली असल्याचे पहावयास मिळत आहे. तयार रूखवताला पसंती पूर्वी लग्नाच्या अगोदर सहा-सहा महिने रूखवताची तयारी केली जायची यासाठी शेजारी-पाजारी सर्वजण मदत करायचे, परंतु आता बहुतांश जण ‘रेडीमेड’ रूखवताला पसंती देत असल्याचे पहावयास मिळत आहे. एका रूखवतासाठी तीन ते पाच हजार रूपये घेतले जातात. रेडिमेट रूखवतामध्ये शोभेच्या वस्तू, लाडू, शेवया, शेव, करंज्या आदी पदार्थांचा समावेश असतो असे रूखवत विक्रेते राजाभाऊ शिंदे यांनी सांगितले. भटजींचे ‘टाईट शेड्यूल’ सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. यात भटजींचे देखील टाईट शेड्यूल असल्याचे पहावयास मिळत आहे. एक भटजी दिवसाकाठी दोन ते तीन लग्नाला हजेरी लावत आहेत. आकराशे रूपयांपासून ते आकरा हजार रूपयांपर्यंत भटजींची दक्षणा असल्याचे अप्पा भोगे गुरूजी यांनी सांगितले. कपड्यांचा बाजार तेजीत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपड्याचे भाव २५ टक्यांनी वाढले आहेत़ लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी नागरिकांची माठी गर्दी होत असून शुटिंग, शर्टिंग पेक्षा रेडिमेट कपड्यांना जास्त मागणी आहे़ यात पुरूषांसाठी ‘इंडोवेस्टन्स’ पोशाखाला चांगली मागणी आहे़ तर महिलांसाठी दुल्हन साडी, शालू, कोलकाता वर्क या साड्यांना लग्नसराईमुळे चांगली मागणी आहे़ असे कपड्याचे व्यापारी राजेश मौजकर यांनी सांगितले़ आचार्‍यांच्या तारखा फुल्ल लग्नाच्या कार्यक्रमासाठी आचारी मिळवणे म्हणजे जिकिरीचे काम बनले आहे़ एक आचारी दिवसाकाठी दोन ठिकाणच्या आॅर्डर स्वीकारत असल्याचे येथील विष्णू केटरर्स बंडू वरेकर यांनी सांगितले़ एक हजार लोकांचा स्वयंपाक करण्यासाठी दहा हजार रूपये सुपारी घेतली जात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले़ मंगल कार्यालयासाठी चढाओढ प्रशस्त ठिकाणी मंगल कार्यालय असावे अशी अट मुलाकडील मंडळींनी बैठकीच्या वेळेसच घातलेली असल्याने वधूपित्यांना मंगल कार्यालयासाठी ७५ हजार ते १ लाख रूपये मोजावे लागत असल्याचे बीड शहरात पहावयास मिळते़ शहरात दहाच्या जवळपास मंगल कार्यालय आहेत़ रजिस्ट्री मॅरेजचे प्रमाण अल्प अवाढव्य खर्चाला फाटा देत अगदी साधेपणाने लग्न करणार्‍यांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे़ अनेक वधू पित्यांना मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते़ मागील वर्षात ३५ ते ४० जणांनीच रजिस्ट्री मॅरेज केलेले असून हे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे पहावयास मिळत आहे़ सोन्याला झळाळी आणि मागणीही यंदाच्या गारपिटीचा परिणाम काही प्रमाणात ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यावर झालेला असल्याचे पहावयास मिळत आहे. लग्न म्हटले की, सोने खरेदी आलीच. गतवर्षीच्या तुलनेत सोन्याच्या भावात २५ टक्क्याची वाढ झालेली आहे. शहरी भागातील ग्राहक मात्र मोठ्याप्रमाणात लग्न समारंभासाठी सोने खरेदी करत असल्याचे शुभम ज्वेलर्सचे प्रमुख मंगेश लोळगे यांनी सांगितले. सोन्याचा भाव ३० हजार रूपये तोळ्याच्या दरम्यान असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Summer clashes un-married!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.