समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन

By Admin | Updated: April 15, 2016 01:48 IST2016-04-15T01:26:15+5:302016-04-15T01:48:44+5:30

औरंगाबाद : परीक्षा संपताच मुलांना वेध लागतात ते उन्हाळ्याच्या सुट्यांचे. आताच्या काळात मामाच्या गावाचे वेड हळूहळू कमी होऊन काहीतरी नवीन शिक ण्याकडे मुलांचा कल असतो.

Summer Camp Expos & Mission Admissions | समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन

समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन


औरंगाबाद : परीक्षा संपताच मुलांना वेध लागतात ते उन्हाळ्याच्या सुट्यांचे. आताच्या काळात मामाच्या गावाचे वेड हळूहळू कमी होऊन काहीतरी नवीन शिक ण्याकडे मुलांचा कल असतो. मुलांना यंदा नवीन क ाय शिकवावे यासाठी पालकही शोध घेत असतात. ही शोधाशोध आता संपणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या शहरातील संस्था, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण याविषयी माहिती देणाऱ्या सर्व नामवंत संस्थांना समर कॅम्प एक्स्पोच्या रूपाने ‘लोकमत’ने एकत्र आणले आहे. हा समर कॅम्प एक्स्पो दि.१६ ते १८ एप्रिल यादरम्यान ‘लोकमत भवन’ येथे सायं. ४ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पसाठी सर्वांनाच प्रवेश मोफत आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, याचा विचार करीत असाल, तर जरा थांबा; कारण या एक्स्पोद्वारे आपले ‘मिशन अ‍ॅडमिशन’ही पूर्ण होणार आहे. आपल्या पाल्याच्या आवडीनुसार त्यांना कोणत्या छंद वर्गाला घालावे इतकेच नव्हे, तर कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या एक्स्पोतील स्टॉलद्वारे पालकांना मिळणार आहेत.
शाळेची शिक्षण पद्धती, सोयी- सुविधा यांचीही माहिती याद्वारे उपलब्ध होईल. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी या एक्स्पोला आवर्जून भेट द्यावी. मुलांच्या मनोरंजनाखेरीज खेळ, फिटनेस झोन तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची व्यवस्थाही येथे असणार आहे, तसेच मुलांच्या बालमनाचा वेध घेणारे अल्लाउद्दीन, जंगल बुक, हम्टी-डम्टी या थीम्सवर आधारित सेल्फी झोन्स मुलांचे आकर्षण ठरतील.

Web Title: Summer Camp Expos & Mission Admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.