सुसाट स्पोर्टस् बाईकने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:19 IST2017-11-26T00:19:17+5:302017-11-26T00:19:22+5:30
भरधाव स्पोर्टस् बाईकस्वाराने रस्ता ओलांडणाºया एका विद्यार्थिनीला जोराची धडक दिली आणि तो एका कारवर धडकून रस्त्याशेजारी उभ्या दोन दुचाकीवर आदळला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सेंट फ्रान्सिस शाळेसमोर घडली.

सुसाट स्पोर्टस् बाईकने उडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भरधाव स्पोर्टस् बाईकस्वाराने रस्ता ओलांडणाºया एका विद्यार्थिनीला जोराची धडक दिली आणि तो एका कारवर धडकून रस्त्याशेजारी उभ्या दोन दुचाकीवर आदळला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सेंट फ्रान्सिस शाळेसमोर घडली.
शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सेंट फ्रान्सिस शाळेसमोर काही विद्यार्थी रस्ता ओलांडत होते. यावेळी आकाशवाणी चौकाकडून सेव्हन हिल पुलाकडे सुसाट निघालेल्या स्पोर्टस् बाईकस्वाराला (क्रमांक एमएच-२० ईआर ३३३९) हे विद्यार्थी दिसताच त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका विद्यार्थिनीला उडविले. समोरील कारवरून उडून दुचाकीस्वार रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दोन दुचाकीवर जाऊन आदळला. या अपघातात दुचाकीस्वार आणि एक विद्यार्थिनी जखमी झाली. दुचाकीस्वाराला किरकोळ मार लागला तर विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर विद्यार्थिनीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची कोणतीही नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नसल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले.