कामगाराची गळफास घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:44 IST2019-07-16T23:43:51+5:302019-07-16T23:44:00+5:30
कामगाराने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली.

कामगाराची गळफास घेवून आत्महत्या
वाळूज महानगर : घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेवून ३४ वर्षीय कामगाराने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. भूषण शिवराम महाले, असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
भूषण महाले हा पत्नी व दोन मुलांसह १० वर्षापासून बजाजनगरात रहात असून, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीत काम करतो. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारात त्याची पत्नी मोठ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. त्यामुळे भूषण एकटाच घरी होता. त्याचवेळी घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
दरम्यान, घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पत्नीने त्याला आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यमाुळे तिने खिडकीतून पाहिले असता भूषण पंख्याला लटकलेला दिसला. पोलिसांना कळविल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.