गोकुळनगर जलकुंभावरुन उडी घेवून आत्महत्या
By Admin | Updated: March 29, 2016 23:52 IST2016-03-29T23:46:22+5:302016-03-29T23:52:57+5:30
नांदेड : शहरातील गोकुळनगर भागात असलेल्या महापालिकेच्या जलकुंभावरुन उडी घेवून आंबेडकरनगर येथील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली़

गोकुळनगर जलकुंभावरुन उडी घेवून आत्महत्या
नांदेड : शहरातील गोकुळनगर भागात असलेल्या महापालिकेच्या जलकुंभावरुन उडी घेवून आंबेडकरनगर येथील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली़ आंबेडकरनगर भागातील सुरेश सोनकांबळे (वय ४०) हा इसम घरगुती वादानंतर मंगळवारी सकाळी गोकुळनगर भागातील जलकुंभाजवळ आला़ जलकुंभाच्या पायऱ्याजवळील प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले होते़ सोनकांबळे यांनी ते कुलूप तोडून पायऱ्याने जलकुंभावर चढला़ त्यानंतर सोनकांबळे यांनी जलकुंभावरुन खाली उडी घेतली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली़ तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली होती़ याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़ (प्रतिनिधी)