विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:16+5:302021-02-05T04:10:16+5:30
शीतल संदीप महाले हिने मंगळवारी सांयकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील पाठीमागील रुममध्ये दोरीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात ...

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
शीतल संदीप महाले हिने मंगळवारी सांयकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील पाठीमागील रुममध्ये दोरीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सायंकाळी पाच वाजता तिला मृत घोषित केले. बुधवारी दुपारी विच्छेदन झाल्यानंतर शीतल महाले हिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
-------------------------
भाजी मंडईतून दुचाकी लंपास
वाळूज महानगर : रांजणगावच्या भाजीमंडईत भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांची दुचाकी लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सुभाषराव अण्णाराव जाधव हे २२ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी (एम.एच.२०, एफ.बी.७१५६) वर स्वार होऊन गावातील भाजीमंडईत भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
-----------------------------
रांजणगावातून तरुण बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगावातून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सचिन हरिदास मढीकर (वय २५, रा. गांधीनगर, रांजणगाव) हा तरुण १५ जानेवारीला घरातून निघून गेला आहे. अद्यापपर्यंत सचिन हा घरी न परतल्याने त्याची आई मिरा मढीकर यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
-----------------------